JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / CSK vs RCB: सीएसकेच्या अडचणींमध्ये वाढ, 14 कोटींचा खेळाडू IPL ला मुकणार

CSK vs RCB: सीएसकेच्या अडचणींमध्ये वाढ, 14 कोटींचा खेळाडू IPL ला मुकणार

चेन्नई संघाला आज आपल्या पाचव्या सामन्यात फाफ डुप्लेसिसच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) तगडे आव्हान असणार आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात

Deepak Chahar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 एप्रिल: पराभवाच्या गर्तेत सापडलेला गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघ यंदा 15 व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी चेन्नई संघाला आज आपल्या पाचव्या सामन्यात फाफ डुप्लेसिसच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे तगडे आव्हान (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore)असणार आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. 14 कोटी खर्च केलेला दीपक चहर (Deepak Chahar Injury) आयपीएलमधून (IPL 2022) बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. महेंद्र सिंह धोनीचा सर्वात आवडता खेळाडू असलेल्या आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील जलद गोलंदाज दीपक चहर आयपीएल 2022 मधील अधिक सामने मुकण्याची शक्यता आहे. जायबंदी झाल्याने तो आता खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘कासवा’सारख खेळत Hardik Pandyaचे षटकारांचे शतक पूर्ण, दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड दीपक चहर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) असून दुखापतीतून सावरण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, दीपक चहरला पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे पुन्हा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक चहर या आठवड्याच्या शेवटी मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार होता, परंतु आता दुखापतीची समस्या पुन्हा समोर आल्यानंतर तो संपूर्ण आयपीएल 2022 मधून बाहेर पडू शकतो. दीपकला कोलकाता येथे ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. दीपकच्या क्वाड्राइसेप मसल्सला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी रिटने केले नव्हते. लिलावात संघाने त्याच्यासाठी 14 कोटी रुपये मोजले होते. यंदाच्या लिलावातील तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्जने लिलावात कधीच कोणत्याही 10 कोटींच्यावर खर्च केले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या