बर्मिंगहम, 01 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेतून भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला बाहेर पडावं लागलं. बीसीसीआयनं शंकरला दुखापतीमुळे खेळणं शक्य नसल्याचं सांगत त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेतलं आहे. मयंक अग्रवाल मधल्या फळीतील फलंदाज असून तो सलामीलासुद्धा खेळू शकतो. रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल सलामीला उतरेल आणि केएल राहुल पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळेल असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे मयंक अग्रवालचे नाव स्टँडबाय खेळाडूंच्या यादीतही नव्हतं. मयंक अग्रवालला संघात घेण्यात आल्यानंतर शंकरच्या दुखापतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्यासारखी दुखापत कशी झाली? इंग्लंडविरुद्ध सामन्यात तो मैदानावर कोल्ड्रिंक्स घेऊन येत होता तेव्हा जखमी नव्हता का? संघव्यवस्थापनाने अचानक त्याच्या दुखापतीची आणि बाहेर जाण्याची माहिती दिली आहे. यामागे शंकरची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही म्हणूनच दुखापतीचं कारण पुढे करून त्याला मायदेशी पाठवलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने विजय शंकर मोठी खेळी करेल असं म्हटलं होतं. तर नाणेफेक करताना त्याला दुखापत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याच्या जागी पंतला संधी दिली. विजय शंकरला सरावावेळी बुमराहचा चेंडू लागला होता. त्यानंतर शंकरने सराव केला नव्हता. ही दुखापत भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या आधी झाली होती. त्यानंतर शंकर दोन सामने खेळळा. या दोन्हीत त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तसेच कोहलीने त्याला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. विजय शंकरला पुन्हा दुखापत झाल्याबद्दल संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय यांच्याकडून सांगण्यात आलं नाही. विराटने पत्रकार परिषदेत त्याची पाठराखण केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संघातून बाहेर असल्याचं सांगितलं. दुखापतीमुळे संघात न खेळणारा शंकर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना ड्रिंक्स देण्यासाठी धावताना दिसला.
भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने शंकरच्या दुखापतीवर प्रश्न उपस्थित केला होता. जर शंकरला दुखापत झाल्यानं तो सामन्यात खेळू शकत नाही तर ड्रिंक्स घेऊन कसा धावत आहे? या कामासाठी दुसरं कोणी नाही का? असे प्रश्न मुरली कार्तिकने ट्विटरवर विचारले होते.
विजय शंकरच्या आधी शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. धवनची दुखापत ठीक होण्यासाठी संघव्यवस्थापनाने 8 ते 10 दिवस वाट पाहिली. त्यानंतर तो खेळू शकणार नाही असे सांगितले आणि ऋषभ पंतला संघात बोलावलं. मात्र, शंकरच्या दुखापतीबद्दल सामन्याआधी कोहली सांगतो आणि दुसऱ्या दिवशी तो खेळू शकणार नाही असं सांगत थेट मयंक अग्रवालला बोलावण्यात आल्यानं संशय निर्माण होत आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात बलाढ्य संघ समजला जात असला तरी काही कमकुवत बाजू आता समोर येत आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या संघाने फलंदाजांची केलेली दमछाक. तसेच इंग्लंडसमोर धावांसाठी धडपडत असलेली मधली फळी भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चार वर्षात चौथ्या क्रमांकावर भारताला एकही भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. वर्ल्ड कपमध्येही भारताने केएल राहुल, पांड्या, विजय शंकर आणि रिषभ पंतला खेळवून प्रयोग केला. आता ऋषभ पंतला पुढच्या सामन्यात संधी दिली नाही तर संघात कोणाला स्थान द्यायचं असाही प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर असेल.
विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला घेण्यात आलं आहे. गेल्या वर्षी भारतीय संघात निवड झालेल्या मयंकला अंतिम 15 मध्ये स्थान दिलं आहे. त्याला कशाच्या आधारावर संघात घेतलं असाही सवाल सोशल मिडियावर विचारला जात आहे. त्याचापेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडू संघात आहेत. अजिंक्य रहाणेचं गेल्या 10 एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहता तोच संघात योग्य आहे असंही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. मयंक अग्रवाल एकही एकदिवसीय सामना खेळला नसताना त्याला घेतला मग अजिंक्य रहाणे निवृत्त झाला काय? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेनं 13 सामन्यात 137 च्या स्ट्राईक रेटनं 393 धावा केल्या आहेत. याबाबतीत त्यानं रोहित शर्मा, केएल राहुल आणि धोनीलाही मागं टाकलं आहे. वाचा : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का? भारतीय संघाकडे संघाकडे दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा यांच्यासारखे दबावात खेळलेले अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना संधी द्यायला हवी अशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसतं आहे. याशिवाय संघात निवड न झालेल्या पण क्षमता असलेल्या खेळाडूंची नावेही चर्चेत आहेत. त्यामध्ये अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र, दोघांचीही अंतिम 15 मध्ये निवड झाली नाही. अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळत आहे. यात त्याने एक शतक आणि अर्धशतक केलं आहे. त्यामुळं तिथली परिस्थिती त्याला अनुकूल अशीच असेल. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये रहाणे संघात होता. त्याला दबावात खेळण्याचा अनुभव आहे. तसेच मधल्या फळीसह सलामीलासुद्धा खेळू शकतो. तरीही त्याला संधी न दिल्यानं चाहत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. World Cup : धोनीवर भडकले दिग्गज, विराटने केली पाठराखण! World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत! ‘तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग’; रोहितनं केली बोलती बंद World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?