JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : पांड्या बंधूंच्या विरहानं हार्दिकची वहिनी भावुक, इमोशनल पोस्टमधून मांडली भावना

VIDEO : पांड्या बंधूंच्या विरहानं हार्दिकची वहिनी भावुक, इमोशनल पोस्टमधून मांडली भावना

अनुभवी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या (Krunal Pandya) आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मार्च : अनुभवी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या (Krunal Pandya) आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पांड्या बंधू  (Pandya Brothers) एकमेकांच्या विरूद्ध खेळणार आहेत. ते यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. हार्दिकची वहिनी म्हणजेच कृणालची पत्नी पंखूडी शर्मानं (Pankhuri Sharma) आयपीएल 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन्ही भावांसाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे. बडोदाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पांड्या बंधूंना  मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2020 च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिलीज केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्सनं 15 कोटींमध्ये हार्दिकला करारबद्ध केले. तो या टीमची कॅप्टनसी करणार आहे. तर दुसरिकडं कृणाल लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants)  खेळणार आहे. कृणालला सुपर जायंट्सनं 8 कोटी 25 लाखांना खरेदी केले आहे.

संबंधित बातम्या

पंखूडी शर्मानं जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दोन्ही भाऊ एकाच टीमकडून खेळणार नाहीत याबद्दल तिनं दु:ख व्यक्त केलं आहे. पंखूडीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर दोन्ही भाऊ एकत्र धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक इमोशनल गाणे सुरू आहे. बेन स्टोक्सनं केली वेस्ट इंडिजची धुलाई, 11 फोर आणि 6 सिक्ससह झळकावलं शतक पंखूडीनं या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ‘माझ्या सर्वात चांगल्या मुलांसाठी. गेली 6 वर्ष मी तुम्हा दोघांना एकाच स्टँडमधून चिअर केलं आहे. यंदा तसं होणार नाही. तुम्हाला दोघांना एकमेकांच्या विरूद्ध खेळताना पाहून मला थोडं वाईट वाटेल. मी हार्दिक पांड्याला दुसऱ्या स्टँडमधून चिअर करेल. आज आणि नेहमी.’  असं तिनं म्हंटलं आहे. आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 29 मे रोजी या स्पर्धेची फायनल खेळली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या