JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup, India vs Pakistan: विजयी भव! वाराणसीमधील गंगा आरतीमध्ये टीम इंडियासाठी प्रार्थना

T20 World Cup, India vs Pakistan: विजयी भव! वाराणसीमधील गंगा आरतीमध्ये टीम इंडियासाठी प्रार्थना

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) आज (रविवार) होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या मॅचमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला हरवावं यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसी, 24 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) आज (रविवार) होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या मॅचमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला हरवावं यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. वाराणसीमध्येही टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा नदीची आरती करण्यात आली. 501 दिवे प्रज्ज्वलीत करत सर्वांनी भारतीय क्रिकेट टीमच्या विजयाची प्रार्थना केली. टीम इंडियाची टी20 वर्ल्ड कपमधील पहिलीच मॅच पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपची जोरदार सुरुवात करावी अशी प्रार्थना केल्याचं या आरतीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी सांगितलं. वाराणसीमधील जगप्रसिद्ध दशाश्वमेध घाटावर दिव्या प्रकाशात टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करण्यात आली. यावेळी टीम इंडियाच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. गंगा नदीची आजची आरती टीम इंडियाला समर्पित असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केले.

आरतीमध्ये उपस्थित सर्व भाविकांनी टीम इंडिया नं पाकिस्तान चा दणदणीत पराभव करावा अशी प्रार्थना केली. या आरतीचं खास आयोजन करण्यात आलं होतं, असं गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा यांनी सांगितलं. टीम इंडियाला चिअर-अप करण्यासाठी येथे खास पोस्ट लावण्यात आले होते. त्याचंही यावेळी पूजन करण्यात आले.

आयसीसी रँकींगमध्ये भारत दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीम आजवर 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळल्या आहेत. त्या प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवलाय. 2016 मधील टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या 55 रनच्या खेळीच्या जोरावर  टीम इंडियानं  विजय मिळवला आहे. T20 World Cup 2021, IND vs PAK : 24 तास आधीच पाकिस्ताननं जाहीर केली टीम, पाहा कुणाला मिळाली संधी भारताने 2014, 2012 मधील टी20 वर्ल्ड कपमध्येही  पाकिस्तान चा पराभव केला होता. तर 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला. त्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये पाकिस्तानला हरवत टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या