JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी : खराब फॉर्ममधील विराट कोहली होणार टीम इंडियातून Out!

मोठी बातमी : खराब फॉर्ममधील विराट कोहली होणार टीम इंडियातून Out!

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात खराब कालखंडातून जात आहे. विराट कोहलीच्या या खराब फॉर्ममुळे निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात खराब कालखंडातून जात आहे. विराट या आयपीएल सिझनमध्ये तीन वेळा पहिल्याच बॉलवर आऊट (Golden Duck) झाला आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहाता त्याला क्रिकेटमधून ब्रेक देण्याची मागणी करण्यात येत आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीमची निवड आयपीएल ‘प्ले ऑफ’ च्या दरम्यान होईल. निवड समितीचे सदस्य भारतीय टीमची घोषणा करण्यापूर्वी विराट कोहलीशी चर्चा करणार आहेत. विराटला ब्रेक देण्याच्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा होईल, अशी माहिती आहे. निवड समितीच्या सदस्यानं ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकारच्या कालखंडातून प्रत्येक खेळाडू जात असतो. विराटही त्याला अपवाद नाही. तो यामधून नक्की बाहेर पडेल. पण, निवड समिती सदस्य म्हणून आम्हाला पहिल्यांदा टीमचा विचार करावा लागेल. आम्ही विराटशी ब्रेकबाबत चर्चा करू.’ इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार विराटला दक्षिण आफ्रिका सीरिजसह आयर्लंड दौऱ्यामधून विश्रांती दिली जाऊ शकते. विराटला विश्रांती का? विराट कोहलीनं बॅटींगवर फोकस करण्यासाठी टीम इंडियाच्या टी20 टीमसह आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. या निर्णयाचा त्याला फारसा फायदा झालेला नाही. या आयपीएल सिझनमध्ये विराटनं 12 मॅचमध्ये 19 च्या सरासरीनं 216 रन केले आहेत. त्याला आत्तापर्यंत फक्त 1 अर्धशतक झळकावता आलं आहे. विराटनं शतक झळकावून आता 100 पेक्षा जास्त इनिंग झाल्या आहेत. IPL 2022 Points Table : KKR च्या विजयाचा CSK सह 2 टीमना मोठा फटका विराटनं टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांच्या सल्ल्यानुसार राजस्थान रॉयल्स विरूद्ध ओपनिंग केली. पण, हा प्रयत्न देखील अपयशी ठरला आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 110 च्या आसपास आहे. जो त्याच्यासारख्या दिग्गज खेळाडूच्या क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. वास्तविक आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे नेहमी टीम इंडियाची निवड केली जाक नाही. पण, आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराट खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच निवड समितीचे सदस्य आगामी सीरिजसाठी टीम निवडण्यापूर्वी विराटशी चर्चा करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या