JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई आणि चेन्नईमधील 'या' 3 खेळाडूंमध्ये आहे एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता

IPL 2022 : मुंबई आणि चेन्नईमधील 'या' 3 खेळाडूंमध्ये आहे एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहेत. या दोन दिग्गज टीममधील लढतीला अल क्लासिको (EL Clasico) नावानं ओळखलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहेत. मुंबईनं आजवर 5 वेळा तर चेन्नईनं 4 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या दोन दिग्गज टीममधील लढतीला अल क्लासिको (EL Clasico) नावानं ओळखलं जातं. या लढतींचा इतिहास पाहिला तर मुंबईचं पारडं जड आहे. मुंबईनं 25 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या आयपीएल सिझनमध्ये 21 एप्रिल रोजी पहिल्यांदा दोन्ही टीम आमने-सामने असतील. या टीममधील कोणते खेळाडू एकहाती मॅच जिंकू शकतात ते पाहूया ऋतुराज गायकवाड विरूद्ध जसप्रीत बुमराह पुण्याचा तरूण ओपनर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) मागील सिझनमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध 58 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली होती. ऋतुराजत्या खेळीनं चेन्नईनं ती मॅच 20 रननं जिंकली होती. ऋतुराजनं बुमराहच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 फोर लगावले होते. दुसरिकडं जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सुरूवातीला आणि डेथ ओव्हर्समध्येही विकेट्स घेणारा बॉलर आहे. दोन्ही टीममध्ये यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये बुमराहनं 2 विकेट्स  घेतल्या होत्या.  गायकवाडनं आयपीएल 2021 मध्ये 635 रन केले होते. तर बुमराहनं 14 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. आगामी सिझनमध्ये दोन्ही खेळाडूंमधील लढाई रंगतदार होणार आहे. कायरन पोलार्ड विरूद्ध रविंद्र जडेजा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आयपीएल 2021 मध्ये चेन्नईला जोरदार तडाखा दिला होता. 218 रनचा पाठलाग करताना मुंबईनं 81 रनवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर पोलार्डनं एकहाती मॅच जिंकली. जडेजानं मुंबई विरूद्ध पहिल्या दोन ओव्हर्समध्ये फक्त 9 रन देत एक विकेट घेतली होती. पोलार्डनं जडेजाच्या एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्सच्या मदतीनं 20 रन काढले.  जडेजा सध्या चांगलाच फॉर्मात आहे. तर पोलार्डकडं T20 क्रिकेटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे या दोघांच्या लढतीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. IPL 2022 : मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंडचा फायदा नाही, रोहित शर्माचा दावा! रोहित शर्मा विरूद्ध दीपक चहर फास्ट बॉलर दीपक चहर  (Deepak Chahar)  दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरूवातीला खेळणार नाही. तो फर्ल्ट हाफ संपेपर्यंत टीममध्ये दाखल होईल अशी सीएसकेला आशा आहे. चहर आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. चहरकडं नवा बॉल स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याच्यावर रोहितची विकेट घेण्याची मोठी जबाबदारी असेल. आयपीएल 2021 मध्ये चहरनं 15 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. तर रोहितनं 14 मॅचमध्ये 381 रन केले आहेत. या दोन भारतीय खेळाडूंमध्येही जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या