मुंबई, 18 मार्च : पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील कराची टेस्टमध्ये मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) शतक झळकावलं. रिझवाननं 104 रनची खेळी केल्यानं या टेस्टमध्ये पाकिस्तानचा पराभव टळला. कराची टेस्ट ड्रॉ झाली. कराची टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी शतक झळकावलेल्या रिझवानचं क्रिकेट विश्वातून कौतुक होत आहे. त्याचबरोबर पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरचा त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कराची टेस्ट संपल्यानंतर डग आऊटकडे जाणाऱ्या रिझवानची मुलाखत पाकिस्तानी महिला पत्रकार जैनब अब्बासनं (Zainab Abbas) घेतली. ही मुलाखत 2.30 मिनिटे चालली. या मुलाखतीच्या दरम्यान रिझवाननं एकदाही अब्बास यांच्याकडे पाहिले नाही. तो संपूर्ण मुलाखतीमध्ये अब्बास यांची नजर टाळत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रिझवानच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मजेशीर पद्धतीनं यावर मत व्यक्त केलंय. तर काही जणांनी रिझवानची प्रशंसा केली आहे.
कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये झालेली दुसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली, पण या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मॅचच्या अखेरच्या इनिंगमध्ये बाबरने 425 बॉलमध्ये 196 रनची खेळी केली, त्याच्या या खेळीमध्ये 21 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 506 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 7 आऊट 443 रन केले. मोहम्मद रिझवाननं अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. रिझवानचं टेस्ट कारकिर्दीमधील हे दुसरंच शतक होतं.
होळीच्या शुभेच्छा देणं एवढं अवघड? हिटमॅननं घेतले 53261 टेक, मजेशीर Video पाहून हसून उडेल पुरेवाट
या सीरिजमधील रावळपिंडीमध्ये झालेली पहिली टेस्ट देखील ड्रॉ झाली होती. त्यानंतर कराची टेस्टचाही निकाल लागला आहे. आता सीरिजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट 21 मार्चपासून लाहोरमध्ये होणार आहे.