मुंबई, 10 जून : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) समाप्त झालं असून आता क्रिकेट फॅन्स भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टी20 मालिकेचा आनंद घेत आहेत. ही मालिका सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या रविवारी आयपीएल स्पर्धेच्या पुढील 5 सिझनसाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीसाठी मीडिया ऑक्शन करण्यात येणार आहे. स्टार इंडियानं 2017 साली आयपीएलचे मीडिया राईट्स 5 वर्षांसाठी खरेदी केले होते. त्याची मुदत आता संपली आहे. त्यावेळी स्टारनं हे राईट्स खरेदी करण्यासाठी 2.55 दशलक्ष डॉलर मोजले होते. ती तेव्हा जगातील सर्वात महाग क्रिकेट डील होती. ई ऑक्शन होणार यंदा पहिल्यांदाच आयपीएल राईट्ससाठी ई ऑक्शनचा (E Auction) वापर होणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर सर्व बोली संपेपर्यंत हे ऑक्शन सुरू असेल. पुढील 5 वर्षांसाठी हे हक्क लागू असतील. आयपीएल मीडिया राईट्स 50 ते 60 हजार कोटी रुपयांना विकले जाऊ शकतात, अशी शक्यता ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने वर्तवली आहे. 4 पॅकेजेस उपलब्ध आयपीएल राईट्ससाठी यंदा 4 पॅकेज उपलब्ध असतील. पॅकेज A मध्ये फक्त भारतीय उपखंडातील प्रसारणाचे अधिकार देण्यात येतील. पॅकेज B मध्ये भारतीय उपखंडातील डिजिटल राईट्सचा समावेश आहे. पॅकेज C मध्ये मर्यादीत मॅचेसचे अधिकार देण्यात येणार असून ते फक्त भारतीय उपखंडातील प्रसारणासाठी असतील. तर पॅकेज D मध्ये जगभरातील अन्य भागांमध्ये प्रसारण आणि डिजिटल हक्कांचा समावेश आहे. क्रिकेटपटूंचा DA मजूरांपेक्षाही कमी, मुंबई विरूद्धच्या मॅचमध्ये भुकेनं व्याकूळ होती टीम! 5 कंपन्यांमध्ये स्पर्धा आयपीएल मीडिया राईट्ससाठी पाच कंपन्यांमध्ये रेस आहे, यात वायकॉम, डिज्नी हॉटस्टार, सोनी, झी आणि अमेझॉन यांचा समावेश आहे. यावेळी डिजीटल प्लॅटफॉर्मवरही फोकस करण्यात आल्यामुळे अमेझॉनसारखा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मही या स्पर्धेत उतरलं आहे.