मुंबई, 11 मे : आयपीएल स्पर्धेतील (IPL ) प्रत्येक सिझनमध्ये नवे स्टार उदयाला येतात. विशेषत: तरूण भारतीय क्रिकेटपटूंना या स्पर्धेनं मोठी संधी निर्माण केली आहे. आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर टीम इंडियात दाखल झालेली अनेक उदाहरणं गेल्या 14 वर्षांमध्ये घडली आहे. यंदाचा सिझनही (IPL 2022) त्याला अपवाद नाही. या आयपीएलमध्येही अनेक तरूण भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ओपनर अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) खेळ पाहून टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला (Yuvraj Singh) त्याचे दिवस आठवले आहेत. अभिषेकसह सीएसकेकड़ून खेळणाऱ्या शिवम दुबेचंही (Shivam Dube) युवराजनं कौतुक केलं आहे. भारतामध्ये टी20 क्रिकेट लोकप्रिय करण्यात आणि 2007 मधील टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा होता. आयपीएलमध्येही त्यानं प्रभावी कामगिरी केली होती. युवराज आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतरही तो आयपीएलमधील प्रत्येक मॅच फॉलो करतो. या सिझनमधील काही खेळाडूंचा खेळ पाहून युवराजला स्वत:च्या बॅटींगची आठवण आली. त्यानं या यादीत पहिलं नाव व अभिषेक शर्माचं घेतलं आहे. अभिषेक शर्मा हा युवराजप्रमाणेच पंजाबचा आहे. अभिषेकनं या आयपीएल सिझनमध्ये आतापर्यंत 132.40 च्या स्ट्राइक रेटनं 331 रन्स केल्या आहेत. सध्या तो एसआरएचचा हाय्येस्ट रन स्कोअरर (Highest Run Scorer) आहे. अभिषेकच्या खेळाचं युवराजनं कौतुक केलं आहे. ‘मी अभिषेक शर्माला खेळताना पाहतो तेव्हा मला खेळ आठवतो. आमचे पुल शॉट्स (Pull Shot), बॅकफूट शॉट्स (Backfoot Shot) जवळपास सारखेच आहेत, असं त्यामं स्पोर्ट्स 18 शी बोलताना सांगितलं. IPL 2022 : लखनऊच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गंभीर नाराज, खेळाडूंचा घेतला क्लास! पाहा VIDEO सीएसकेच्या(CSK) शिवम दुबेमध्येही (Shivam Dube) युवराजला स्वत:च्या खेळाचा भास होतो. शिवम दुबेनं चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत नऊ मॅचेस खेळल्या असून, 160.34 च्या स्ट्राइक रेटनं 279 रन्स केल्या आहेत. ‘शिवमच्या आणि माझ्या स्टाईलमध्येही बरंच साम्य आहे. पण, तो बऱ्याच काळापासून खेळत आला आहे. आता तो 28 वर्षांचा आहे. आतापर्यंत त्यानं किती वन-डे क्रिकेट खेळलं आहे, हे मला माहीत नाही. या मुलांमध्ये टॅलेंट (Talent) आहे, असं वाटत असेल तर त्यांना अधिक संधी (Chance) दिली पाहिजे. शिवम असो किंवा इतर कोणताही प्लेअर असो त्यांन खेळ सुधारण्यासाठी अधिक संधी द्याव्या लागतील,’ असं मत युवराजनं व्यक्त केलं.