मुंबई, 14 मार्च : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनची (IPL 2022) सुरूवात चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या मॅचनं होणार आहे. 26 मार्च रोजी ही मॅच खेळली जाईल. या मॅचचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या मॅचपूर्वी डोकेदुखी कायम आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि दीपक चहर (Deepak Chahar) हे दोन सीएकेचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. चेन्नईची टीम आयपीएल स्पर्धेसाठा सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमममध्ये सराव करत आहे. या कॅम्पमध्ये ऋतुराज आणि चहर अद्याप आलेले नाहीत. हे दोघंही बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादामीमध्ये (NCA) त्यांच्या फिटनेसवर काम करत आहेत. ऋतुराजनं मागील आयपीएल सिझनमध्ये सर्वात जास्त रन करत ऑरेंज कॅप पटकावली होती. तर सध्या फॉर्मात असलेल्या दीपक चहरला चेन्नईनं तब्बल 14 कोटींमध्ये खरेदी केले आहे. ऋतुराजच्या हाताला दुखापत झाली असून चहरचे स्नायू दुखावले आहेत. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) सीरिजच्या दरम्यान चहर दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला किमान सहा ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहवे लागेल. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Vishwanathan) यांनी टीमच्या प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसबाबत खुलासा केला आहे. ‘ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर यांच्या फिटनेसाबाबत आम्हाला सध्या माहिती नाही. तसंच ते टीममध्ये कधी सहभागी होतील, याबाबत काही सांगू शकत नाही. ते सध्या नॅशनल क्रिकेट अकदामीमध्ये आहेत. ते मॅच खेळण्यासाठी फिट झाल्यावर बीसीसीआय आम्हाला त्याबाबत कल्पना देईल.’ असे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले. IPL 2022 : हार्दिक पांड्यानं दिलं सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर, बॉलिंग करण्याबाबत म्हणाला… टीम इंडियातील कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकदामीतील विशेष ट्रेनिंग पूर्ण करावी लागते. एनसीएनं फिट असल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच तो खेळाडू पुढील मॅच खेळू शकतो. ऋतुराज आणि चहर प्रमाणेच सूर्यकुमार यादवही सध्या एनसीएमध्येच आहे.