मुंबई, 21 मार्च : आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) नव्या कॅप्टनसह उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) यंदा आरसीबीचा कॅप्टन असेल. फाफनं आरसीबीमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेतली आहे. आरसीबीनं आयपीएल 2002 मधील मेगा ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) चेन्नईनं रिलीज केलेल्या फाफला 7 कोटींमध्ये खरेदी केले आहे. फाफ ड्यू प्लेसिसप्रमाणेच रैनालाही सीएसकेने रिलीज केले होते. पण, त्याला कोणत्याही टीमनं खरेदी केले नाही. फाफनं आरसीबीच्या प्रॅक्टीस सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने आणखी एका आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
या व्हिडीओवर सुरेश रैनानंही प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॅप्टनला शुभेच्छा, मित्रा सर्व चांगलं होऊ दे’ अशा शुभेच्छा रैनानं दिल्या आहेत. रैनाच्या या शुभेच्छांना फाफनंही उत्तर दिलं आहे. ‘धन्यवाद भावा’ असं उत्तर त्यानं रैनाला दिलं आहे. रैनाचा नुकताच मालदिवस सरकारनं विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे. वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं रचला इतिहास, लाराचा 18 वर्षांपूर्वीचा मोडला रेकॉर्ड आरसीबीला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. आता सीएसकेमधून आलेला फाफवर टीम मॅनेजमेंटनं कॅप्टनपदासह विजतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. आरसीबीची टीम : विराट कोहली, फाफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, फिन अॅलन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभूदेसाई, रदरफोर्ड, हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाशदीप, अनिश्वर गौतम, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, चमा मिलिंद, जोश हेजलवूड, जेसन बेहरनड्रॉफ, सिद्धार्थ कौल, लवनिथ सिसोदीया, डेव्हिड विली