JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, SRH vs PBKS : आक्रमक पंजाबला 'कुल' हैदराबादचं चॅलेंज, पाहा दोन्ही टीमची संभाव्य Playing11

IPL 2022, SRH vs PBKS : आक्रमक पंजाबला 'कुल' हैदराबादचं चॅलेंज, पाहा दोन्ही टीमची संभाव्य Playing11

आयपीएल 2022 मध्ये पहिल्या दोन पराभवानंतर कमबॅक करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची आज (रविवार) लढत पंजाब किंग्ज (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) विरूद्ध होणार आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये पहिल्या दोन पराभवानंतर कमबॅक करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची आज (रविवार) लढत पंजाब किंग्ज (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) विरूद्ध होणार आहे. ही मॅच जिंकून टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न पंजाब किंग्ज करणार आहे. तर ही मॅच जिंकून नेट रनरेट चांगला करण्याचा सनरायझर्स हैदराबादचा प्रयत्न असेल. हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही टीमनं 5-5 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 3-3 विजय मिळवले आहेत. सनरायझर्स हैदराबादची गाडी विजयाच्या रूळावर आणण्यात राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कॅप्टन केन विल्यमसनची साथ मिळाली तर टीमचं काम आणखी सोपं होणार आहे. हैदराबादची बॉलिंग फॉर्मात आहे. उमरान मलिक, मार्को जेनसन, अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट टी. नटराजन असा फास्ट बॉलिंगचा अटॅक हैदराबादकडं आहे. तो पंजाबच्या आक्रमक बॅटींगची परीक्षा घेणार आहे. पंजाबनं गुजरात टायटन्स विरूद्ध झालेल्या पराभवानंतर कमबॅक केलं आहे. कॅप्टन मयंक अग्रवाल टीममध्ये बदल करण्याची शक्यता नाही. पंजाबच्या जॉनी बेअरस्टो आणि ओडियन स्मिथ या विदेशी खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. पंजाबच्या बॅटींगमध्ये चांगलीच खोली आहे. तर हैदरबादची बॅटींग टॉप 5 जणांवर अवलंबून आहे. हैदराबादला या मॅचमध्ये ऑल राऊंडर वॉशिंग्टन सुंदरची कमतरता जाणवणार आहे. सुंदर दुखापतीमुळे एक आठवडा आयपीएलपासून दूर आहे. टीम इंडियातील जागा गमावलेल्या पुजाराची इंग्लंडमध्ये कमाल, पहिल्याच मॅचमध्ये चिवट खेळी सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing11 : अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सूचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी नटराजन पंजाब किंग्जची संभाव्य Playing 11 : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, राहुल चहर, वरुण अरोरा, अर्शदीप सिंह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या