मुंबई, 30 मार्च : सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) नव्या सिझनची सुरूवात खराब झाली आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) त्यांचा 61 रननं मोठा पराभव केला. मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादच्या टॉप ऑर्डरनं साफ निराशा केली. हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) या मॅचमध्ये अपयशी ठरला. तो पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 रन काढून आऊट झाला. विल्यमसनच्या विकेटवर नवा वाद सुरू झाला आहे. हैदराबादच्या इनिंगमधील दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवर देवदत्त पडिक्कलनं विल्यमसनचा कॅच पकडला. थर्ड अंपायरनं विल्यमसन आऊट असल्याचा निर्णय दिला. या निर्णयावर हैदराबादच्या फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या विकेट्सचे जोरदार पडसाद उमटले आहेत.
हैदराबादचा मोठा पराभव हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 210 रनपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) 27 बॉलमध्ये 55 रन केले, तर पडिक्कलने 41, जॉस बटलरने 35 आणि हेटमायरने 32 रनची खेळी केली. हैदराबादकडून उमरान मलिक आणि टी नटराजन यांना प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर तसंच रोमारियो शेफर्डला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 : SRH च्या पराभवात NO BALL चा वाटा, टीम इंडियाच्या बॉलरकडून मोठी चूक राजस्थानने दिलेलं 211 रनचं आव्हान पार करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 149 रनपर्यंत मजल मारता आली.हैदराबादकडून एडन मार्करमने (Aiden Markram) 41 बॉलमध्ये नाबाद 57 रन केले, तर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 14 बॉलमध्ये 40 रनची तडाखेबाज खेळी केली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. ट्रेन्ट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं.