मुंबई, 2 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) प्रत्येक मॅचमध्ये अक्षरश: आग ओकत आहे. उमराननं प्रत्येक मॅचमध्ये 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत अनेक दिग्गजांना गुडघे टेकायला लावलं आहे. मलिकने आयपीएलच्या आतापर्यंतचा 15 मोसमातला सगळ्यात जलद बॉल टाकला आहे. 10 व्या ओव्हरमध्ये मलिकने ऋतुराज गायकवाडला 154 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला. त्यानं यावेळी गुजरात टायटन्सच्या लॉकी फर्ग्युसनचा रेकॉर्ड मोडला. उमराननं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 9 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं गुजरात टायटन्स विरूद्धच्या मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. उमरानच्या वेगाची अनेक टीममध्ये धडकी भरली आहे. त्याच्या वेगापासून कसा बचाव करायचा याच मजेशीर सल्ला टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी दिला आहे. सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्स बोलताना विनोदी पद्धतीनं सांगितलं की, ‘उमरानच्या फास्ट बॉलिंगपासून वाचायचं असेल तर बॅटरनं एक रन काढून नॉन स्ट्रायकर एंडला जावं. इतकंच नाही तर त्यानं उमरानपासून तीन स्टम्प लपवून ठेवावेत. ज्यामुळे तो नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन रन अप करणार नाही. त्याला बॅटरचा ऑफ आणि लेग स्टम्प कुठे आहे, हे पाहण्यासाठी त्रास व्हायला पाहिजे.’ IPL 2022 : 6 पराभवानंतरही आहे CSK ला ‘प्ले ऑफ’ ची संधी, वाचा काय आहे समीकरण चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात मलिकने दोनवेळा सगळ्यात जलद बॉलचा विक्रम केला, असला तरी त्याची कामगिरी निराशाजनक झाली. मलिकने 4 ओव्हरमध्ये 48 रन दिले, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता आगामी सामन्यात दमदार पुनरावृत्ती करण्याचं लक्ष्य उमरानचं असेल.