JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार बदल 'मराठवाडा एक्स्प्रेस'ला मिळणार संधी

IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार बदल 'मराठवाडा एक्स्प्रेस'ला मिळणार संधी

CSK vs SRH: चेन्नईचा नवा कॅप्टन रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आता सनरायझर्स विरूद्ध ही प्रतीक्षा संपवण्यासाठी चेन्नईच्या टीममध्ये एक बदल होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 एप्रिल : चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटाकवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या सिझनमध्ये खराब सुरूवात झाली आहे. चेन्नईनं पहिल्या तीनही मॅच गमावल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्या तीन मॅच गमावण्याची नामुश्की चेन्नईवर पहिल्यांदाच ओढावली आहे. आज (शनिवारी) आयपीएलमधये डबल हेडर होणार असून त्यामधील पहिली मॅच सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) यांच्यात होणार आहे. चेन्नईचा नवा कॅप्टन रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आता सनरायझर्स विरूद्ध ही प्रतीक्षा संपवण्यासाठी चेन्नईच्या टीममध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील स्टार राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar) समावेश होऊ शकतो. ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजवर्धनला चेन्नईनं 1.5 कोटींमध्ये खरेदी केले आहे. राजवर्धनचा मुकेश चौधरीच्या जागी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. राजवर्धन प्रती तास  140 किमीच्या आसपास बॉलिंग करू शकतो. त्याचबरोबर लोअर ऑर्डरमध्ये उपयुक्त बॅटींग करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे. दीपक चहरच्या अनुपस्थितीमध्ये चेन्नईला भारतीय बॉलर्सची कमतरता जाणवत आहे. चेन्नईनं यापूर्वी तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांना संधी दिली आहे. त्यांनी निराश केलंय. त्यामुळे हैदराबाद विरूद्ध राजवर्धनला संधी मिळू शकते. राजवर्धनच्या मदतीला ड्वेन ब्राव्हो, प्रिटोरीयस आणि ख्रिस जॉर्डन हे अनुभवी विदेशी बॉलर चेन्नईकडं आहेत. सनरायझर्स हैदराबादची या सिझनमध्ये सुरूवात खराब झाली आहे. त्यांनी पहिले दोन्ही सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्स विरूद्धही त्यांचा रेकॉर्ड चांगला नाही. दोन्ही टीममध्ये आत्तापर्यंत 16 सामने झाले असून त्यामधील फक्त 4 सामने हैदराबादनं जिंकले आहेत. तर 12 मध्ये चेन्नईनं विजय मिळवलाय. IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर फॅन्स संतप्त, विदेशी खेळाडूला केली शिवीगाळ चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing 11 : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरीयस, ड्वेन ब्राव्हो आणि राजवर्धन हंगर्गेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या