JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : श्रेयस अय्यरनं पुन्हा केलं KKR च्या CEO बाबत वक्तव्य, टीम निवडीबाबत दिलं स्पष्टीकरण

IPL 2022 : श्रेयस अय्यरनं पुन्हा केलं KKR च्या CEO बाबत वक्तव्य, टीम निवडीबाबत दिलं स्पष्टीकरण

मुंबईवरील विजयानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) टीमचे सीईओ वेंकी मैसूर (KKR CEO Venky Mysore) यांच्याबाबत वक्तव्य करत खळबळ उडवली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) पराभव करत ‘प्ले ऑफ’ मधील आव्हान कायम ठेवलं आहे. या स्पर्धेत झगडणाऱ्या केकेआरनं शनिवारी सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईवरील विजयानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) टीमचे सीईओ वेंकी मैसूर (KKR CEO Venky Mysore) यांच्याबाबत वक्तव्य करत खळबळ उडवली होती. आता हैदराबादचा पराभव केल्यानंतर त्यानं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाला होता श्रेयस? श्रेयस मुंबई इंडियन्स वरील बोलताना म्हणाला की, ‘टीमच्या निवडीबाबत मोठी चर्चा झाली. यावेळी टीमच्या कोचसह सीईओ देखील उपस्थित होते. या बैठकीत कोण खेळणार आणि कोण नाही याबाबतचे निर्णय झाले. जे खेळाडू खेळणार नव्हते, त्यांनी कोच ब्रँडन मॅकलुम यांनी स्वत: भेटून या निर्णयाची कल्पना दिली. कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धात्मक पातळीवरील क्रिकेट खेळलेलं नाही. त्यानंतरही ते टीम निवडीमध्ये हस्तक्षेप का करतात हा प्रश्न उपस्थित झाला होता. या सर्व प्रकरणावर श्रेयसनं अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. केकेआरचे सीईओ कधीही टीम निवडीमध्ये सहभागी नसतात, असे श्रेयसने सांगितले. ‘मागील मॅचमध्ये मी सीईओ टीम निवडीत मदत करतात असं सांगितलं त्याचा अर्थ ते प्लेईंग 11 मध्ये नसलेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतात, असा होतो.’ असे सांगत श्रेयसनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. राहुल द्रविडनं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन, PHOTO पाहून होईल तुमच्या दिवसाची प्रसन्न सुरूवात! ‘आम्ही या मॅचमध्ये योग्य मानसिकतेसह उतरलो होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. पुण्यातील या पिचवर टॉस जिंकणे आवश्यक होते. आंद्रे रसेलला जास्त स्ट्राईक देण्याची आमची योजना होती. वॉशिंग्टन सुंदरची ओव्हर शिल्लक आहे, हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे रसेल शेवटपर्यंत खेळावा अशी आमची इच्छा होती. हैदराबाद विरूद्ध 177 हा चांगला स्कोर होता,’ असेही श्रेयसने यावेळी सांगितले. रसेलनं सुंदरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्सह 20 रन काढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या