JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : जखमी वाघानं केली लखनऊची शिकार, राहुल कधीही विसरणार नाही जखम

IPL 2022 : जखमी वाघानं केली लखनऊची शिकार, राहुल कधीही विसरणार नाही जखम

मागील दोन आयपीएल सिझनमध्ये एलिमेनेटरचा अडथळा पार करू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (RCB) यंदा एक पाऊल पुढे टाकलं आहे.

जाहिरात

Photo : BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : मागील दोन आयपीएल सिझनमध्ये एलिमेनेटरचा अडथळा पार करू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (RCB) यंदा एक पाऊल पुढे टाकलं आहे. आरसीबीनं बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) 14 रननं पराभव केला. रजत पाटीदारचं (Rajat Patidar) शतक हे आरसीबीच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. त्याचबरोबर हर्षल पटेलनं (Harshal Patel) मॅचच्या निर्णायक क्षणी केलेली बॉलिंग ही आरसीबीच्या विजयात महत्त्वाची ठरली. हर्षल गुजरात टायटन्स विरूद्धच्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना जखमी झाला होता. हर्षलच्या हाताला दुखापत झाली आणि टाके पडले होते. त्यामुळे त्यानं गुजरात विरूद्ध फक्त 1 ओव्हर बॉलिंग केली. लखनऊ विरूद्धच्या मॅचमध्येही बॉलिंग करताना त्याची जखम ताजी होती. पण, हर्षलनं त्याचा खेळावर परिणाम होऊ दिला नाही. त्यानं डेथ ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करत लखनऊला विजयापासून दूर ठेवले. हर्षलनं लखनऊच्या इनिंगमधील 18 वी आणि 20 वी ओव्हर टाकली. त्यानं 18 व्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन देत मार्कस स्टॉईनिसची विकेट घेतली. तर शेवटच्या ओव्हरमध्ये एव्हिन लुईससारखा आक्रमक बॅटर असूनही हर्षलनं फक्त 9 रन दिले. हर्षलनं दोन्ही डेथ ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी रन देत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यानं संपूर्ण मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 25 रन देत एक विकेट घेतली. IPL 2022 : गुजरात किंवा राजस्थान नाही तर RCB होणार चॅम्पियन! ‘लकी चार्म’ करणार विराटचं स्वप्न करणार पूर्ण मागील सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेल्या हर्षलला यंदा आरसीबीनं 10 कोटी 75 लाखांना पुन्हा खरेदी केले आहे. आरसीबीकडून डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यानं आत्तापर्यंत 14 सामन्यात 7.56 च्या इकोनॉमी रेटनं 19 विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबीला आयपीएल विजेतेपदाचं  स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी दोन अडथळे पार करायचे आहेत. उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये हर्षलकडून याच प्रकराच्या कामगिरीची आरसीबीला अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या