मुंबई, 26 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) 14 रननं पराभव करत आयपीएल 2022 मधील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीनं दिलेलं 208 रनचं आव्हान लखनऊला झेपलं नाही. त्यांची टीम निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 193 रन केले. आरसीबीकडून रजत पाटीदार (Rajat Patidar) दमदार शतक झळकावलं. माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मोठा स्कोर केला नाही, पण तो संपूर्ण लयीत दिसला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या आरसीबीची सुरूवात खराब झाली. कॅप्टन फाफ डुप्लेसिस शून्यावर आऊट झाला. या खराब सुरूवातीचा विराटवर परिणाम झाला नाही. त्यानं दुसऱ्या ओव्हरमध्ये चमीराच्या बॉलवर फ्लिक शॉट लगावत बांऊड्री लगावली. विराटच्या या जबरदस्त फटक्याला स्टेडिअममधील सर्व फॅन्सनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेले बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा यांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. विराटनं मारलेला फोर पाहातच जय शहा यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी यावेळी गांगुलीच्या काही तरी सांगितलं. ते ऐकूण बीसीसीआय अध्यक्ष चांगलेच खूश झाले आणि त्यांनीही आनंदानं टाळ्या वाजवल्या.
रजत पाटीदारने 49 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. पाटीदार 54 बॉलमध्ये 112 रनवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. पाटीदारला दिनेश कार्तिकनेही (Dinesh Karthik) चांगली साथ दिली. कार्तिकने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 37 रन केले.तर विराट कोहली 25 रन काढून आऊट झाला. IPL 2022 : दोन ओव्हरमध्ये निश्चित झाला लखनऊचा पराभव, कॅप्टन राहुलही ठरला जबाबदार केएल राहुलने (KL Rahul) 58 बॉलमध्ये 79 रन केले, तर दीपक हुड्डाने (Deepak Hooda) 26 बॉलमध्ये 45 रन केले. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला (Josh Hazlewood) सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आता आरसीबीला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक मॅच खेळावी लागणार आहे. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी क्वालिफायरची दुसरी मॅच होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम रविवारी फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.