JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, RCB vs GT : आरसीबीनं टॉस जिंकला, बँगलोर गुजरातला धक्का देणार?

IPL 2022, RCB vs GT : आरसीबीनं टॉस जिंकला, बँगलोर गुजरातला धक्का देणार?

आयपीएल 2022 मधील आजचा (शनिवार) पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यात होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 मधील आजचा (शनिवार) पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यात होत आहे. सलग दोन पराभवानंतर आरसीबीचा ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यांना आता फॉर्मातील गुजरात टायटन्सचा अडथळा पार करायचा आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरातही आठपैकी फक्त एका सामन्यात पराभव पत्कारला असून पॉईंट टेबलमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये आरसीबीचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेलिसनं याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. आरसीबीनं या मॅचमध्ये एक बदल केलाय. सूयश प्रभूदेसाईच्या जागी महिपाल लोमरोरचा टीममध्ये समावेश केलाय. तर गुजरातनं दोन बदल केले आहेत. यश दयाल आणि अभिनव मनोहरच्या जागी प्रदीप संगवान आणि साई सुदर्शनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. गुजरातनं शेवटच्या मॅचमध्ये राशिद खानच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवला होता. राशिद खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राशिद बॅटींगप्रमाणेच बॉलिंगमध्येही बँगलोरची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. राशिदला लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी यांची साथ असेल. यापैकी फग्युर्सन हैदराबाद विरूद्धच्या शेवटच्या ओव्हमध्ये महागडा ठरला होता. आरसीबीकडून विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटींगकडे सर्वांचं लक्ष असेल. मागच्या तीन मॅचमध्ये विराटनं फक्त 9 रन केले आहेत. विराट खराब फॉर्ममध्ये असल्यानं फाफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलवर आरसीबीच्या बॅटींगची मोठी भिस्त असेल. आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक चांगलाच फॉर्मात आहे. IPL 2022 : सततच्या पराभवानं रोहित शर्मा… दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर Playing11 : विराट कोहली, फाफ ड्यूप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महीपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज गुजरात टायटन्स Playing : शुभमन गिल, वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, प्रदीप संगवान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या