JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : विराट कोहलीनं एका हातानं कॅच घेताच अनुष्कानं मारली उडी, सासू-सासऱ्यांनीही वाजवल्या टाळ्या, पाहा VIDEO

IPL 2022 : विराट कोहलीनं एका हातानं कॅच घेताच अनुष्कानं मारली उडी, सासू-सासऱ्यांनीही वाजवल्या टाळ्या, पाहा VIDEO

आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) या मॅचमध्ये बॅटींगमध्ये फार कमाल करता आली नाही. तो 12 रन काढून आऊट झाला. त्यानंतर फिल्डिंगमध्ये मात्र विराटनं निर्णायक क्षणी कॅच घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) या आयपीएल सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 16 रननं पराभव केला. आरसीबीचा सहा सामन्यातील हा चौथा विजय आहे. या विजयानंतर आरसीबीचे आठ पॉईंट्स झाले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांनी सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) या मॅचमध्ये बॅटींगमध्ये फार कमाल करता आली नाही. तो 12 रन काढून आऊट झाला. त्यानंतर फिल्डिंगमध्ये मात्र विराटनं निर्णायक क्षणी कॅच घेत मॅचचं पारडं आरसीबीच्या बाजूनं झुकवलं. दिल्लीच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराटनं एका हातानं दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतचा (Rishbah Pant) कॅच घेतला. ऋषभ पंतनं त्यापूर्वी फटकेबाजी सुरू केली होती. 34 रनवर खेळत असलेला पंत आरसीबीसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच विराटनं त्याचा कॅच घेत दिल्लीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. विराटनं ही कॅच घेताच त्याची पत्नी अनुष्का चांगलीच खूश झाली होती. अनुष्कासोबत विराटचे सासू-सासरे देखील ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांनीही टाळ्या वाजवत या कॅचचा आनंद साजरा केला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 189 एवढा स्कोअर केला. दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) वादळी खेळीमुळे आरसीबाला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. IPL 2022 : लखनऊनं लगावला विजयाचा चौकार पण कॅप्टन राहुलला बसला दंड कार्तिकने 34 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. कार्तिकने 194.12 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. कार्तिकला शाहबाज अहमदनेही चांगली साथ दिली. अहमद 21 बॉलमध्ये 32 रनवर नाबाद राहिला, त्याने 3 फोर आणि 1 सिक्स मारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या