JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : DRS मुळे झाला CSK चा पराभव, RCB नं 5 बॉलमध्ये जिंकली मॅच

IPL 2022 : DRS मुळे झाला CSK चा पराभव, RCB नं 5 बॉलमध्ये जिंकली मॅच

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएल 2022 निराशाजनक ठरलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरूद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये सीएसकेचा 13 रननं पराभव झाला.

जाहिरात

फोटो - IPL

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएल 2022 निराशाजनक ठरलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरूद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये सीएसकेचा 13 रननं पराभव झाला. सीएसकेचा हा दहा मॅचमधील 7 वा पराभव आहे. या पराभवानं त्यांची ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. या मॅचमध्ये आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 173 रन केले. त्याला उत्तर देताना सीएसकेनं 8 आऊट 160 रन केले. आरसीबीच्या या विजयात डीआरएसचा महत्त्वाचा वाटा होता. आरसीबीचा स्कोर 19 ओव्हरनंतर 7 आऊट 157 होता. त्यावेळी दिनेश कार्तिक सोडून सर्व प्रमुख बॅटर आऊट झाले होते. ड्वेन प्रिटोरीयसनं टाकलेल्या 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर कार्तिक एलबीडब्ल्यू असल्याचा निर्णय मैदानातील अंपायरनं घेतला. या निर्णयाला कार्तिकनं थर्ड अंपायरकडं आव्हान दिलं. त्यावेळी रिप्लेमध्ये बॉल लेग स्टम्पच्या बाहेर पडल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे थर्ड अंपायरनं कार्तिकला नॉट आऊट दिलं. त्यामुळे कार्तिकला आणखी एक संधी मिळाली. दिनेश कार्तिकनं त्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सिक्स लगावला. तर तिसऱ्या आणि सहाव्या बॉलवर 2-2 रन काढले. पाचव्या बॉलवर हर्षल पटेल रन आऊट झाला. या पद्धतीनं कार्तिकनं शेवटच्या 5 बॉलमध्ये 16 रन काढले. कार्तिक पहिल्या बॉलवर आऊट झाला असता तर कदाचित आरसीबीला हे रन करता आले नसते. कार्तिकनं 17 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. त्याची ही खेळी विशेषत: शेवटच्या ओव्हरमधील फटकेबाजी आरसीबीच्या विजयात निर्णयाक ठरली. IPL 2022 : विराटची ‘गांधीगिरी’, पंगा घेणाऱ्या मुकेशलाही मागावी लागली माफी, Video आरसीबीनं दिलेल्या 174 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात चांगली झाली होती. ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांच्यात 6.4 ओव्हरमध्ये 54 रनची पार्टनरशीप झाली, पण यानंतर आरसीबीच्या बॉलरनी सीएसकेला वारंवार धक्के दिले. डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 56 रन केले, तर मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 रनची खेळी केली. आरसीबीकडून हर्षल पटेलला 3 आणि ग्लेन मॅक्सवेलला 2 विकेट मिळाल्या. शाहबाज अहमद, जॉश हेजलवूड आणि वानिंदु हसरंगा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या