मुंबई, 23 मार्च : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) खूप महत्त्वाचा आहे. याच सिझनमधून भारतीय टीमला भविष्यातील कॅप्टन मिळेल, असं मत टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केलं आहे. ते आयपीएल ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ नं आयोजित केलेल्या एका खास पत्रकार परिषदेत बोलत होते. शास्त्रींनी यावेळी संभाव्य कॅप्टन म्हणून शर्यतीमध्ये असलेल्या खेळाडूंची नावंही सांगितली. ‘विराट कोहली आता कॅप्टन नाही. रोहित शर्मा विशेषत: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. त्यामुळे भविष्यात टीमची कॅप्टनसी कोण करेल, हे या स्पर्धेत पाहिलं जाईल. कॅप्टनसीच्या शर्यतीमध्ये श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे खेळाडू सध्या आघाडीवर आहेत. भविष्यातील मजबूत कॅप्टनच्या शोधासाठी ही स्पर्धा मोठी संधी आहे.’ अय्यरचं नाव कुणी ऐकलं होतं? शास्त्री यावेळी पुढे म्हणाले, ‘गेल्या आयपीएल सिझनमध्ये आपण व्यंकटेश अय्यरला पाहिलं. त्याच्याबद्दल कुणीही ऐकलं नव्हतं. आयपीएल स्पर्धा संपली तेव्हा तो भारतीय टीममध्ये होता. हीच आयपीएलची खासियत आहे.’ गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) बॉलिंग करण्याच्या प्रश्नाचं अद्याप उत्तर दिलेलं नाही. हार्दिकवर संपूर्ण देशाची नजर असेल, असं शास्त्री यांनी यावेळी सांगितलं. हार्दिक पाठदुखीमुळे मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) एकही मॅच खेळलेला नाही. त्यानंतरही गुजरात टायटन्स या नव्या आयपीएल टीमनं त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. रवी शास्त्री आणि सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएल स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट्सच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत. आगामी आयपीएलमध्ये फास्ट बॉलर्सवर अधिक लक्ष दिले जाईल. कारण, यावर्षी टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातील फास्ट आणि बाऊन्स होणाऱ्या पिचवर खेळला जाणार आहे, असं शास्त्रींनी यावेळी सांगितलं. IPL 2022 पूर्वी रोहितची मस्ती, लेकीसोबत केला मजेशीर डान्स! पाहा VIDEO ‘माझ्या मते टीम इंडियाचा अन्य कोणत्याही विषयापेक्षा फास्ट बॉलिंग अधिक सक्षम करण्यावर भर असेल. कारण आयपीएलनंतर 4 महिन्यांनी टीम ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.’ रवी शास्त्री यंदा सात वर्षांच्या अंतरानं कॉमेंट्रीमध्ये पुनरागमन करत आहेत. पण, हिंदीमध्ये ते पहिल्यांदाच कॉमेंट्री करतील.