JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : पंजाबच्या विजयाचे फिल्मी कनेक्शन, वाचा RCB वरील विजयाची Inside Story

IPL 2022 : पंजाबच्या विजयाचे फिल्मी कनेक्शन, वाचा RCB वरील विजयाची Inside Story

आरसीबीनं (RCB) पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 205 रन केले होते. आरसीबीनं उभारलेला हा आव्हानात्मक डोंगर पंजाबनं (PBKS) 5 विकेट्स आणि 6 बॉल राखत पार केला. पंजाबच्या या विजयाचे फिल्मी कनेक्शन आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 मधील रविवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (PBKS vs RCB) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 205 रन केले होते. आरसीबीनं उभारलेला हा आव्हानात्मक डोंगर पंजाबनं 5 विकेट्स आणि 6 बॉल राखत पार केला. ऑलराऊंडर ओडियन स्मिथ (Odean Smith) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने मोहम्मद सिराजच्या  (Mohammad Siraj) एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावत मॅचचं चित्र बदललं. त्यानंतर पॉवर हिटर शाहरूख खाननं (Shahrukh khan) 19 व्या ओव्हरमध्ये विजयावर शिक्कमोर्तब केलं. स्मिथनं फक्त 8 बॉलमध्ये 25 रन काढले. त्यानं या मॅचनंतर या जबरदस्त खेळीचं रहस्य सांगितलं आहे. ‘पंजाब किंग्जनं आजवर आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेच्यापूर्वी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. आम्ही आरसीबी  विरूद्ध खेळण्यापूर्वी 14 PEAKS हा प्रेरणादायी सिनेमा पाहिला. आमच्यासाठी आरसीबी हे पहिलं शिखर होते. आणखी 13 शिखर बाकी आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर सर्व खेळाडूंमध्ये उत्साह वाढल. ते या स्पर्धेसाठी नव्या उत्साहानं सज्ज झाले. कुंबळेनं दिला मंत्र पंजाबच्या टीमला हा सिनेमा दाखवण्याची कल्पना हेड कोच अनिल कुंबळेची (Anil Kumble) होती. ‘या सिनेमात गिर्यारोह एक-एक करत 14 शिखर सर करतो. त्याचप्रमाणे  पंजाबला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी 14 मॅच जिंकणे आवश्यक आहे,’ असे कुंबळे सिनेमा पाहिल्यानंतर खेळाडूंना सांगितले. IPL 2022 : लखनऊची टीम पदार्पणापूर्वीच अडचणीत, पाहा कोणत्या 11 खेळाडूंना देणार राहुल संधी स्मिथनं त्यानंतर पुढे सांगितलं की, ‘चांगली सुरूवात करण्यावर आमचा फोकस होता. एकदा चांगली सुरूवात मिळाली की आमच्याकडं लोअर ऑर्डरमध्ये पॉवर हिटर बॅटर आहेत.  आरसीबी विरूद्ध आम्हाला चांगली सुरूवात मिळाली. त्याचा फायदा घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता पंजाबची पुढील मॅच 1 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या