JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबईच्या 19 वर्षांच्या खेळाडूची कमाल, पंतचा 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

IPL 2022 : मुंबईच्या 19 वर्षांच्या खेळाडूची कमाल, पंतचा 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

मुंबई इंडियन्सचा 19 वर्षांचा क्रिकेटपटू तिलक वर्मानं (Tilak Varma) गुरूवारच्या मॅचमध्ये टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) पाच वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्सचा 19 वर्षांचा क्रिकेटपटू तिलक वर्मानं (Tilak Varma) गुरूवारच्या मॅचमध्ये टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (MI vs CSK) 32 बॉलमध्ये 34 रन केले. त्यानं या खेळीबरोबरच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) पाच वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. तिलक वर्माचे 12 सामन्यानंतर 368 रन झाले आहेत. आयपीएल स्पर्धेतील एका सिझनमध्ये सर्वाधिक रन करणारा टीन एजर खेळाडू बनला आहे. यापूर्वी ऋषभ पंतनं 2017 साली झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 14 मॅचमध्ये  366 रन काढले होते. तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी शॉ आहे. त्यानं 2019 साली 16 सामन्यांत 353 रन केले आहेत. तिलक वर्मानं पंतला 12 सामन्यांमध्येच मागे टाकले आहे. वर्माला मुंबई इंडियन्सनं मेगा ऑक्शनमध्ये 1 कोटी 70 लाखांना विकत घेतले. त्याचा हा पहिलाच आयपीएल सिझन असून तो या सिझनमध्ये मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. कॅप्टन रोहित शर्मा किंवा 15.25 कोटी देऊन खरेदी केलेल्या इशान किशनपेक्षाही जास्त रन वर्मानं केले आहेत. रोहित शर्माची डोकेदुखी वाढली! जडेजा, चहरसह 5 भारतीय खेळाडू जखमी रोहितनं केली प्रशंसा तिलक वर्माची ही कामगिरी बघून मुंबई आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रभावित झाला आहे, तसंच तो लवकरच भारताकडून खेळेल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला आहे. ‘तो हुशार आहे. पहिल्याच वर्षी डोकं एवढं शांत असणं सोपं नाही. लवकरच तो भारतासाठी सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळेल, त्याच्याकडे टेकनिक आणि टेम्प्रमेंट आहे, त्याच्यासाठी भविष्य उज्वल दिसत आहे, तसंच त्याच्यात भूकही आहे,’ असं वक्तव्य रोहितने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या