मुंबई, 22 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही आयपीएलमधील गुरूवारी झालेली मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या 4 बॉलमध्ये 16 आणि शेवटच्या बॉलवर 4 रनची आवश्यकता होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) हे सर्व रन करत चेन्नईला विजय मिळवून दिला. जयदेव उनाडकतच्या शेवटच्या बॉलवर फोर लगावत धोनीनं टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हा चेन्नई सुपर किंग्सचा या सिझनमधील दुसराच विजय असून मुंबईचा सलग सातवा पराभव आहे. चेन्नईनं या विजयासह ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. चेन्नईचा कॅप्टन रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) हा विजय मिळवताच सुटकेचा निश्वास सोडला. जडेजासाठी गुरूवारचा दिवस खराब गेला. त्यानं दोन कॅच सोडले. तसंच तो फक्त 3 रन काढून आऊट झाला होता. जडेजा आऊट झाल्यानंतर चेन्नईच्या हातातून निसटलेली मॅच धोनीनं पुन्हा एकदा खेचून आणली. मॅच संपल्यानंतर धोनी पॅव्हिलियनमध्ये परत जात असताना जडेजा धोनीसमोर नतमस्तक झाला. तसंच त्यानंतर अंबाती रायुडूनं देखील धोनीला पाहून हात जोडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 रन हवे होते, तेव्हा उनाडकटने पहिल्या बॉलला प्रिटोरियसची विकेट घेतली, यानंतर बॅटिंगला आलेल्या ब्राव्होने एक रन काढून धोनीला स्ट्राईक दिला. तिसऱ्या बॉलला धोनीने सिक्स मारली, मग चौथ्या बॉलला फोर मारून सीएसकेला विजयाजवळ पोहोचवलं. पाचव्या बॉलला 2 रन काढल्यानंतर शेवटच्या बॉलला सीएसकेला 4 रन हव्या होत्या, तेव्हा धोनीने फोर मारून मुंबईच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला. IPL 2022 : धोनीची रणनिती, पोलार्ड अडकला जाळ्यात, त्या गेम प्लाननंतर पुढच्याच बॉलला आऊट आयपीएलच्या या मोसमातला मुंबई इंडियन्सचा हा लागोपाठ सातवा पराभव आहे. या हंगामात मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आली नाही. तर चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई नवव्या तर मुंबई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.