मुंबई, 28 मार्च : मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवून आयपीएल स्पर्धेची दमदार सुरूवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा ऑल राऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) जखमी झाला आहे. मार्श सध्या ऑस्ट्रेलियन टीमसोबत पाकिस्तानमध्ये आहे. या दुखापतीमुळे तो पाकिस्तान विरूद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार असलेल्या मार्शला ट्रेनिंगच्या दरम्यान हिप फ्लेक्सर (Hip Flexors) झाल्याचं उघड झालं आहे. या दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप समजलेलं नाही. ही दुखापत गंभीर असल्यास मार्शला किमान सहा आठवडे विश्रांती घ्यावी लागू शकते, त्यामुळे त्याचा आयपीएल स्पर्धेतील सहभाग अनिश्चित आहे. पाकिस्तान विरूद्धची सीरिज संपल्यानंतर मार्श आयपीएल स्पर्धेसाठी भारतामध्ये येणार होता. त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं 6.50 कोटींमध्ये खरेदी केले होते होते. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंना पाकिस्तान विरूद्धच्या वन-डे आणि टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेलनं या स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली होती. त्यातच मार्श देखील जखमी झाल्यानं ऑस्ट्रेलियन कॅप्टन आरोन फिंचची डोकेदुखी वाढली आहे. मार्शच्या जागी ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वन-डे 29 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. IPL 2022 : पंजाबच्या विजयाचे फिल्मी कनेक्शन, वाचा RCB वरील विजयाची Inside Story ऑस्ट्रेलियन टीमचा 1998 नंतरचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. या दौऱ्यातील तीन टेस्टची सीरिज ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी जिंकली. रावळपिंडी आणि कराचीमधील टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानं लाहोर टेस्ट 115 रनच्या मोठ्या फरकानं जिंकत टेस्ट सीरिज खिशात घातली.