JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : अंपायरला बॉल लागल्यावर पोलार्ड लागला हसू, रोहितनंही दिली साथ! पाहा Video

IPL 2022 : अंपायरला बॉल लागल्यावर पोलार्ड लागला हसू, रोहितनंही दिली साथ! पाहा Video

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि अंपायर यांच्यात 36 चा आकडा आहे. क्रिकेट मॅचच्या दरम्यान अनेकदा त्याचा आणि अंपायरचा वादही झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे :  वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि अंपायर यांच्यात 36 चा आकडा आहे. क्रिकेट मॅचच्या दरम्यान अनेकदा त्याचा आणि अंपायरचा वादही झाला आहे. मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये पोलार्डनं अंपायरला बॉल फेकून मारला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. केकेआरची बॅटींग सुरू असताना 10 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. पोलार्डनं हा प्रकार मुद्दाम केला नाही. पॉलर्ड केकेआरच्या इनिंगमधील 10 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी बॉल त्याच्या हातामधून निसटला आणि अंपायरला लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलार्ड हसू लागला. रोहितनंही हसून त्याला दाद दिली. सुदैवानं तो बॉल जास्त जोरात अंपायरला लागला नाही. पोलार्डनं यावेळी अंपायरकडे जाऊन दिलगिरीही व्यक्त केली.

संबंधित बातम्या

सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईने केकेआरला 9 आऊट 165 वर रोखलं. पहिल्या 10 ओव्हरमध्येच केकेआरचा स्कोअर 100 च्या पुढे होता, त्यामुळे ते 200 चा टप्पा गाठणार असं वाटत होतं, पण बुमराहच्या भेदक बॉलिंगपुढे केकेआरने गुडघे टेकले. बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 10 रन देऊन 5 विकेट घेतल्या. बुमराहची आयपीएलमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. IPL 2022, LSG vs GT Dream 11 Team Prediction: ‘हे’ खेळाडू करतील तुम्हाला मालामाल 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची टीम 17.3 ओव्हरमध्ये 113 रनवर ऑल आऊट झाली. केकेआरकडून कमिन्सनं 3, रसेलनं 2 आणि टीम साऊदीला 1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कमिन्स दुसऱ्यांदा मुंबईसाठी व्हिलन ठरला. याआधी झालेल्या मॅचमध्ये कमिन्सने डॅनियल सॅम्सच्या एका ओव्हरमध्ये 35 रन ठोकले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या