JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : गुजरात किंवा राजस्थान नाही तर RCB होणार चॅम्पियन! 'लकी चार्म' करणार विराटचं स्वप्न करणार पूर्ण

IPL 2022 : गुजरात किंवा राजस्थान नाही तर RCB होणार चॅम्पियन! 'लकी चार्म' करणार विराटचं स्वप्न करणार पूर्ण

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 10 पैकी 7 टीम बाहेर पडल्या असून 3 टीमचं आव्हान शिल्लक आहे. यंदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची किल्ली आरसीबीकडं (RCB) आहे.

जाहिरात

Photo : BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 चा चॅम्पियन कोण? याचा निर्णय आता फक्त 2 मॅचनंतर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये (IPL 2022) यंदा 10 टीम सहभागी झाल्या होत्या. आता 72 सामन्यांनतर गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) या 3 टीम शिल्लक आहेत. यापैकी गुजरातची टीम फायनलमध्ये पोहचली असून त्यांची लढत राजस्थान विरूद्ध आरसीबी यांच्यातील विजेत्या टीमशी होणार आहे. आयपीएल विजेतेपदाच्या शर्यतामध्ये अद्याप 3 टीम असल्या तरी विजेतेपदाची किल्लीही आरसीबीकडं आहे. आरसीबीनं चौथ्या क्रमांकासह ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एलिमेनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केले. आता पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स आणि पहिल्या क्रमांकावरील गुजरात टायटन्स यांचा अडथळा पार करून रविवारी आरसीबीनं आयपीएल विजेतेपदाचा करंडक जिंकला तर आश्चर्य वाटायला नको. यंदा आरसीबी का जिंकणार? आरसीबीच्या विजेतेपदाची खात्री ही त्यांच्या टीममधील फक्त दिग्गज खेळाडूंमुळे दिली जात नाही. यापूर्वी देखील आरसीबीकडं दिग्गज खेळाडू होते. विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये कायम असलेल्या राजस्थान आणि गुजरातकडंही मॅचविनर खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच त्यांनी आरसीबीपेक्षा जास्त पॉईंट्स घेत ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला होता. आरसीबीच्या विजेतेपदाची प्रतीक्षा हा या सिझनमध्ये एकही सामना न खेळलेला कर्ण शर्मा (Karn Sharma) संपवणार आहे. कर्णला आरसीबीनं यंदा 50 लाखांना खरेदी केले होते. कर्ण शर्मा हा आयपीएलमधील लकी चार्म समजला जातो. तो ज्या टीममध्ये असतो त्यांना आयपीएल विजेतेपद मिळते अशी समजूत आहे. VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग! कर्ण 2016 साली सनरायझर्स हैदराबादकडे होता त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद पटकावले. 2017 साली विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा तो सदस्य होता. त्यानंतर 2018 ते 2021 या कालावधीमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडे होता. या कालावधीत सीएसकेनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. यंदा कर्ण आरसीबीकडं आहे. त्यामुळे हा ‘लकी चार्म’ विराट कोहलीचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करेल असं मानलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या