मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल स्पर्धेत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सदस्य आहे. हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या आवेशनं या आयपीएल सिझनचीही चांगली सुरूवात केली आहे. आवेश आयपीएल स्पर्धा गाजवत असताना त्याची आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध गुरूवारी झालेल्या मॅचपूर्वी बोलताना आवेशनं ही माहिती दिली. आवेशला यावेळी त्याच्या आईच्या तब्येतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, ‘आई आता बरी आहे. पण, अजूनही हॉस्पिटलमध्येच अॅडमिट आहे. तिला युरीन इन्फेक्शन झाले आहे. आईला 2 वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तेव्हापासून तिला त्रास होत आहे.’ आवेशनं कौटुंबिक परिस्थितीचा परिणाम खेळावर होऊ दिलेला नाही. त्यानं सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये 24 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. आवेशनं आत्तापर्यंत टीम इंडियाकडून 2 टी20 सामने खेळले आहेत. या आयपीएलमध्ये त्याला लखनऊनं 10 कोटींना खरेदी केलं आहे. आवेश आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला की, ‘मागील मॅचमध्ये (हैदराबाद विरूद्ध) चांगली कामगिरी केल्यानंतर मला खूप छान वाटक आहे. पण, आता नवा दिवस आहे. मला त्याच पद्धतीनं बॉलिंग करत टीमला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आम्ही ओल्या बॉलनं बॉलिंग करण्याचा सराव करत आहोत. त्याचा मॅचमध्ये फायदा होतो. आमची कोणतीही मीटिंग झालेली नाही. आम्ही मैदानात एकमेकांशी बोलून परिस्थिती सोपी करण्याचा प्रयत्न करतो,’ असे आवेश यावेळी सांगितले. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का, पराभवानंतर पंतचं झालं लाखोंचं नुकसान आवेशला दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध एकही विकेट घेण्यात अपयश आले. त्यानं 3 ओव्हर्समध्ये 32 रन दिले. अर्थात लखनऊच्या अन्य बॉलर्सनी प्रभावी मारा करत दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 आऊट 149 रनवरच रोखले. त्यानंतर लखनऊनं 150 रनचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत या सिझनमधील सलग तिसरा विजय मिळवला.