मुंबई, 22 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याच्या खास स्टाईलनं चेन्नईला विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेली ही मॅच चेन्नई सुपर किंग्सनं 3 विकेट्सनं जिंकली. चेन्नईचा या स्पर्धेतील हा दुसराच विजय आहे. तर मुंबई इंडियन्सनं सलग 7 सामने गमावण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. पॉईंट टेबलचं समीकरण काय? मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमच्या आता 7-7 मॅच झाल्या आहेत. आयपीएलच्या या सिझनमध्ये प्रत्येक टीम 14 मॅच खेळणार आहे. मुंबईनं आता उरलेल्या 7 ही मॅच जिंकल्या तर त्यांचे 14 पॉईंट्स होतील. सध्या पॉईंट टेबलमध्ये 2 टीम 10 पॉईंट्सवर तर 3 टीम 8 पॉईंट्सवर आहेत. त्यामुळे मुंबईनं उरलेल्या 7 ही मॅच जिंकून 14 पॉईंट्स कमावले तरी त्यांच्यासाठी ‘प्ले ऑफ’चा दरवाजा उघडणे अवघड आहे.
दुसरिकडं चेन्नईनं 7 मॅचनंतर 2 विजय आणि 5 पराभवासह 4 पॉईंट्स कमावले आहेत. चेन्नईचा सध्याचा रनरेट हा - 0.534 आहे. त्यांना ‘प्ले ऑफ’ गाठण्यासाठी उर्वरित सर्व मॅचमध्ये ‘जिंकू किंवा मरू’ या जिद्दीनं खेळलं पाहिजे. तसंच रनरेट चांगला करण्यावरही भर द्यावा लागेल.
IPL 2022 : धोनीनं 3 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती, रोहितला नडली गंभीर चूक
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) 6 मॅचनंतर 5 विजय आणि 10 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं 7 मॅचनंतर 10 पॉईंट्स कमावले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नंबर आहे. या दोन्ही टीमचे प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. सनरायझर्स हैदराबादचेही 8 पॉईंट्स असून त्यांचा रनरेट कमी असल्यानं ते पाचव्या क्रमांकावर आहेत.दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या टीमचा त्यानंतर नंबर असून या सर्व टीमचे प्रत्येकी 6 पॉईंट्स आहेत.