JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : हार्दिक पांड्यानं केलं लाखोंचं नुकसान, मॅच थांबवण्याची आली वेळ

IPL 2022 : हार्दिक पांड्यानं केलं लाखोंचं नुकसान, मॅच थांबवण्याची आली वेळ

गुजरात टाययन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात झालेली मॅच हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) गाजवली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 एप्रिल : गुजरात टाययन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात झालेली मॅच हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) गाजवली. गुजरातच्या कॅप्टननं सुरूवातीला दमदार अर्धशतक झळकावत टीमला संकटातून बाहेर काढलं. हार्दिकच्या नाबाद 87 रनच्या खेळीमुळे गुजरातनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 192 रन केले. राजस्थानला 193 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 155 रन करू शकली. हार्दिकनं या मॅचमध्ये ऑल राऊंड खेळ केलाच त्याचबरोबर लाखोंचं नुकसानही केलं. हार्दिकनं हे नुकसान त्याच्या जबरदस्त वेगामुळे केलं. त्याच्या वेगापुढे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनचा (Sanju Samson) स्पीडही कमी पडला. राजस्थानच्या दोन विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेला संजू मैदानात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हार्दिकनं केलेल्या एका डायरेक्ट थ्रो मुळे तो रन आऊट झाला. हार्दिकचा हा थ्रो इतका जबरदस्त होता की यामुळे मॅचसाठी वापरण्यात आलेला LED स्टम्प देखील तुटला. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये LED स्टम्पचा वापर केला जातो, त्याची किमंत लाखोंच्या घरात असते. हार्दिकनं तो स्टम्प तोडल्यानं या पैशांचं नुकसान झालं. तसंच त्यानंतर नवा स्टम्प लावण्यासाठी काही काळ मॅच थांबवावी लागली. IPL 2022 : हार्दिकनं केली राशिद खानची नक्कल, लेगस्पिनरलाही आवरलं नाही हसू! VIDEO हार्दिकनं निर्णायक क्षणी संजू सॅमसनला आऊट करत मॅच गुजरातच्या बाजूनं झुकवली. त्यानंतर राजस्थानचे बॅटर्स ठराविक अंतरानं आऊट झाले. गुजरातचा पाच सामन्यातील हा चौथा विजय असून 8 पॉईंट्ससह ही टीम आता पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचे पाच सामन्यानंतर 3 विजय आणि 2 पराभवासह 6 पॉईंट्स झाले असून ही टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या