JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : बॉल न लागता उडाला स्टम्प, गुजरातचा खेळाडू ठरला दुर्दैवी! पाहा VIDEO

IPL 2022 : बॉल न लागता उडाला स्टम्प, गुजरातचा खेळाडू ठरला दुर्दैवी! पाहा VIDEO

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील दुसरा विजय मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शुक्रवारी मिळवला. मुंबईनं गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 5 रननं पराभव केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील दुसरा विजय मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शुक्रवारी मिळवला. मुंबईनं गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 5 रननं पराभव केला. या मॅचमध्ये गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये 9 रन काढता आले नाहीत. त्याचबरोबर त्यांचा बी साई सुदर्शन (B Sai Sudharsan) हा खेळाडू दुर्दैवी पद्धतीनं आऊट झाला. पोलार्डच्या बॉलिंगवर सुदर्शन हिट विकेट झाला. या पद्धतीनं आऊट झालेला तो या सिझनमधील पहिलाच खेळाडू आहे. गुजरातच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. पोलार्डच्या बॉलवर शॉट लगावण्याच्या नादात सुदर्शन क्रिझच्या आत गेला. त्यामुळे त्यानं संतुलन गमावलं आणि त्याची बॅट स्टम्पला जाऊन लागली. त्यावेळी सुदर्शन 14 रन काढून खेळत होता. सुदर्शनला सुरूवातीला आपण या पद्धतीनं आऊट झाल्याचा विश्वास बसला नाही. सुदर्शननं आऊट होण्याच्या दोन बॉल आधीच पोलार्डला सिक्स मारला होता. तो आऊट होण्यापूर्वीच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 30 बॉलमध्ये 48 रनची गरज होती. तसंच त्यांच्या 8 विकेट्स बाकी होत्या. त्यावेळी गुजरातचा विजय शक्य आहे, असाच अनेकांचा समज होता. पण, प्रत्यक्षात तसं झालं नाही. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 18 व्या ओव्हरला रन आऊट झाला आणि मुंबईला मॅचमध्ये परतण्याची संधी मिळाली.  इशान किशननं त्याला रन आऊट केलं होतं. हार्दिकनं यावेळी डाईव्ह मारण्याचा प्रयत्नच केला नाही. हार्दिक पांड्या आऊट झाल्यानंतरही गुजरातला विजयाची संधी होती. पण, राहुल तेवातियानं शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकसारखीच चूक केली. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 9 रन हवे होते. डेव्हिड मिलर आणि तेवातिया मैदानात असल्यानं गुजरातसाठी हे सोपं आव्हान होतं. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर राहुल तेवातिया रन आऊट झाला. एक रन काढल्यानंतर दुसऱ्या रनसाठी हळू पळणं त्याला महागात गेलं. तिलक वर्मानं अचूक थ्रो करत त्याला परत पाठवलं. IPL 2022 : रोहित शर्माच्या सिक्सचा कारला ‘PUNCH’, चांगल्या कामासाठी मिळाले 5 लाख  राहुल तेवातिया आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला. डॅनियल सॅम्सनं शेवटच्या तीन बॉलमध्ये फक्त 1 रन देत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या