मुंबई, 8 एप्रिल : गेल्या काही सिझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) या आयपीएल सिझनमध्ये खराब सुरूवात झाली आहे. दिल्लीनं मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत सुरूवात तर जोरदार केली. त्यानंतर त्यांना सलग दोन मॅचमध्ये पराभव सहन करावा लागला. गुजरात टायटन्सनंतर लखनऊ सुपर जायंट्सनंही त्यांचा पराभव केला आहे. गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊनं दिल्लीचा 6 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीनं दिलेलं 150 रनचं आव्हान लखनऊनं शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. 3 मॅचमधील दिल्लीचा हा दुसरा पराभव असून सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. या पराभवानंतर दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर (Rishabh Pant) स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीनं लखनऊ विरूद्ध निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण न केल्यानं पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सिझनमध्ये या प्रकारची कारवाई झालेला पंत तिसरा कॅप्टन आहे. यापूर्वी केन विल्यमसन आणि रोहित शर्मा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पंतनं व्यक्त केली नाराजी ऋषभ पंतनं दिल्लीच्या पराभवानंतर टीममधील बॅटर्सना दोष दिला आहे. ‘या पद्धतीनं दव असेल तर तुम्ही तक्रार करू शकत नाही. आम्ही 10-15 रन कमी केले. आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी ज्या पद्धतीनं पुनरागमन केलं, त्याचं संपूर्ण श्रेय त्यांना जातं.’ IPL 2022 : आयपीएल हिरोज घडवणाऱ्या मुंबई इंडियन्सला फटका, सोडून दिलेल्या खेळाडूंनीच केली कमाल पंत पुढे म्हणाला की, ‘मॅचच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत 100 टक्के खेळ करण्याचा निर्धार आम्ही दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी केला होता. त्यानंतर निकाल काहीही लागला तरी ठीक. पॉवर प्ले चांगला गेला पण आम्हाला कोणतीही विकेट मिळाली नाही. आमच्या स्पिनर्सनी मिडल ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली, पण अखेर आम्हाला 10-15 रन कमी पडले.’ असे सांगत पंतनं टीमच्या बॅटींगवर नाराजी व्यक्त केली.