मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचं सर्वात जास्त 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या सिझनमधील (IPL 2022) सुरूवात खराब झाली आहे. मुंबईनं पहिल्या तीन्ही मॅच गमावल्या असून पॉईंट टेबलमध्ये टीम 9 व्या नंबरवर आहे. आयपीएल स्पर्धेला अनेक हिरोज देणाऱ्या या टीमकडून यंदा एक मोठी चूक झाली आहे. ( फोटो - BCCI/IPL)
लखनऊ सुपर जायंट्सनं दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मिळवलेल्या विजयात मुंबईचा माजी खेळाडू क्विंटन डी कॉकचा (Quinton de Kock) मोठा वाटा होता. डी कॉकनं दिल्ली विरूद्ध 52 बॉलमध्ये 80 रन केले. डी कॉक आयपीएल 2021 मध्ये मुंबईचा सदस्य होता. अर्थात मुंबईनं सोडून दिल्यानंतर यशस्वी झालेला डी कॉक हा एकमेव खेळाडू नाही (फोटो - BCCI/IPL)
मुंबई इंडियन्सचा माजी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आता गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. हार्दिकनं या सिझनमधील दोन्ही मॅचमध्ये पूर्ण 4 ओव्हर बॉलिंग केली आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर येत महत्त्वाची इनिंग खेळली आहे. हार्दिकला रिटेन न करण्याची चूक मुंबईला महाग पडल्याचं सध्या दिसत आहे.
हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या (Krunal Pandya) आता मुंबईकडून नाही तर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतोय. कृणालनं पहिल्या 4 मॅचमध्ये 7 च्या इकोनॉमी रेटनं रन दिले आहेत. मुंबईला भरवशाच्या स्पिनरची कमतरता जाणवत असताना कृणालनं लखनौच्या विजयात अचूक बॉलिंगनं वाटा उचलला आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी लेग स्पिनर राहुल चहरनं (Rahul Chahar) पंजाब किंग्जकडून 3 मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. राहुल आत्तापर्यंत पंजाबचा सर्वात यशस्वी बॉलर असून तो ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीमध्येही आहे.
मुंबईचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला त्याचा जोडीदार ट्रेन्ट बोल्टची (Trent Boult) कमतरता जाणवत आहे. बोल्ट या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. त्यानं 3 मॅचमध्ये 7.16 च्या इकोनॉमी रेटनं 5 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या 3 मॅच गमावल्यानंतर मुंबईसाठी आता सर्व मॅच महत्त्वाच्या आहेत. मुंबईची पुढील मॅच शनिवारी (9 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे. मुंबईला ही मॅच जिंकण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मासह सर्वच खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेनुसार खेळ करणे आवश्यक आहे.