मुंबई, 11 मार्च : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनची सुरूवात 26 मार्चपासून होत आहे. या सिझनच्या पहिल्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमची डोकेदुखी वाढली आहे. या टीमचा प्रमुख खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) सुरूवातीच्या मॅच खेळणार नाही. वॉर्नर त्याचा हिरो शेन वॉर्नच्या (Shane Warne) अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. वॉर्नला 30 मार्च रोजी मेलबर्नमध्ये संपूर्ण राजकीय सन्मानात निरोप दिला जाणार आहे. डेव्हिड वॉर्नरनं सांगितलं की, ‘मी शेन वॉर्नला शेवटचा निरोप देण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार यामध्ये कोणतीही शंका नाही. पाकिस्तान विरूद्ध लाहोरमध्ये होणारी तिसरी टेस्ट संपल्यानंतर मी घरी परतेल.’ लाहोर टेस्ट 25 मार्च रोजी संपणार आहे. वॉर्न पुढे म्हणाला की, ‘मी वॉर्नचा खेळ पाहात मोठा झालो आहे. तो माझा आयडॉल होता. मी भिंतीवर त्याचे पोस्टर लावले होते. मला त्याच्यासारखं व्हायचं होतं. मी त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तो खूप भावनात्मक क्षण असेल.’ शेन वॉर्नला 30 मार्च रोजी संपूर्ण राजकीय सन्मानानं निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार वॉर्नरला 5 एप्रिलपर्यंत मेलबर्नमध्येच राहावे लागेल. तो 6 एप्रिल रोजी मुंबईत दाखल होईल. डेव्हिड वॉर्नर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मुंबईत येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला आणखी 5 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट होईल. ती टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधील बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात वॉर्नरची भूमिका महत्त्वाची होती. या कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. वॉर्नरने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 289 रन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये वॉर्नरने 38 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली होती. याआधी त्याने पाकिस्तानविरुद्ध 49 रन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 89 रन केले होते. Women’s world cup : टीम इंडियाची सर्वात मोठी शक्तीच ठरतेय डोकेदुखी, काय करणार मॅनेजमेंट उपाय? आयपीएलच्या 150 मॅचमध्ये वॉर्नरने 41.6 ची सरासरी आणि 139.97 च्या स्ट्राईक रेटने 5449 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे.