मुंबई, 7 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीची आज (गुरूवार) लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध (DC vs LSG) मॅच होणार आहे. या मॅचमध्ये वॉर्नर खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे वॉर्नर उशीरा भारतामध्ये दाखल झाला. त्यानंतर आवश्यक असलेला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर वॉर्नर दिल्लीकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा अनेक वर्ष कॅप्टन राहिलेल्या वॉर्नरनं आयपीएल कारकिर्दीची सुरूवात दिल्लीच्या टीमकडूनच केली होती. या ऑक्शननंतर त्याची एक प्रकारे घरवापसीच झाली आहे. टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्लीचा कॅप्टन आहे. पंतच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्यासाठी वॉर्नर उत्सुक आहे. वॉर्नरची एक मुलाखत दिल्ली कॅपिटल्सनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये वॉर्नर म्हणाला की, ‘मला ऋषभ पंतकडून एका हातानं शॉट मारण्याचं शिकायचं आहे. तो तरूण कॅप्टन आहे. टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मला त्याच्याबरोबर बॅटींग करायची देखील इच्छा आहे.’ असं वॉर्नरनं सांगितलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये एक विजय आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्य 7 व्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या समावेशानंतर ही टीम आणखी मजबूत होणार आहे. IPL 2022 : 10 दिवसांमध्ये झाली जादू, जोरदार भांडण झालेल्या कृणालबद्दल हुड्डा म्हणतो… दिल्ली कॅपिटल्सची टीम : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, खलील अहमद, अश्विन हेब्बार, रिपल पटेल, यश ढूल, विकी ओत्सवाल, लुंगी एनगिडी, टीम सायफर्ट, प्रवीण दुबे, रोव्हमन पॉवेल, ललित यादव