मुंबई, 13 एप्रिल : शिवम दुबे (Shivam Dube) आणि रॉबिन उथप्पाच्या (Robin Uthappa) वादळी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील पहिला विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये दुबेनं 46 बॉलमध्ये नाबाद 95 रन केले, यात 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. उथप्पाने 50 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली. या दोघांच्या खेळीबरोबरच सीएसकेच्या 36 वर्षांच्या खेळाडूनं घेतलेला थरारक कॅच हा देखील चर्चेचा विषय ठरला. आरसीबीच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. सीएसकेकडून कॅप्टन रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमध्ये जडेजानं सुरूवातीला हसरंगाला आऊट केलं. त्यानंतर चौथ्या बॉलवर आकाशदीपचीही विकेट घेतली. आकाशदीपच्या विकेटचं श्रेय अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) जाते. जडेजानं टाकलेला बॉल आकाशदीपनं लवकर खेळला. तो कव्हरच्या दिशेनं जात होता. त्यावेळी त्या भागात फिल्डिंग करत असलेल्या रायुडूनं उजवीकडं झेपावत एका हातानं आकाशदीपचा कॅच पकडला. चेन्नईने दिलेल्या 217 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 193 रन करता आले. मॅक्सवेलने 11 बॉलमध्ये 26, शाहबाज अहमदने 27 बॉलमध्ये 41, सुयश प्रभुदेसाईने 18 बॉलमध्ये 34 आणि दिनेश कार्तिकने 14 बॉलमध्ये 34 रनची खेळी केली. या सर्वांचे प्रयत्न अखेर अपुरे पडले. IPL 2022 : 17 बॉलमध्ये निश्चित झाला CSK चा विजय, RCB चे बॉलर्स विसरणार नाहीत ‘ती’ धुलाई सीएसकेकडून महीश तीक्षणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाला 3 विकेट मिळाल्या. मुकेश चौधरी आणि ड्वॅन ब्राव्होला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.