मुंबई, 9 मे : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खडतर झाला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं दिल्लीचा (CSK vs DC ) 91 रननं मोठा पराभव केला. सीएसकेनं दिलेल्या 209 रनचा पाठलाग करताना दिल्लीची संपूर्ण टीम 17.4 ओव्हर्समध्ये फक्त 117 रनवर ऑल आऊट झाली. दिल्लीला डेव्हिड वॉर्नरकडून मोठी आशा होती, पण तो फक्त 19 रन काढून आऊट झाला. सीएसकेचा स्पिनर महेश थीक्षाणाच्या बॉलिंगवर वॉर्नर एलबीडब्ल्यू झाला. अंपायर नितीन मेनन यांनी दिलेल्या निर्णयावर वॉर्नर समाधानी नव्हता. त्यानं तातडीनं थर्ड अंपायरकडं याबाबत दाद मागितली. थर्ड अंपायरनं ‘अंपायर्स कॉल’ च्या आधारावर वॉर्नरला आऊट दिले. वॉर्नरनं पॅव्हिलियनममध्ये जाण्यापूर्वी अंपायर नितीन मेननला चांगलीच खुन्नस दिली. तो जवळपास आठ सेकंद त्यांच्याकडं रोखून पाहात होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न देण्याच्या वादग्रस्त निर्णयात अंपायर मेनन सहभागी होते. वॉर्नरच्या नाराजीला त्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे. दिल्लीला आता ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित तीन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
सीएसकेकडून मोईन अलीनं 3, तर ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यापूर्वी डेव्हॉन कॉनवेनं 49 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीनं 87 रन काढले. त्यानं ऋतुराज गायकवाड (41) बरोबर पहिल्या विकेटसाठी 110 तर शिवम दुबे (32) बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 59 रनची भागिदारी केली. IPL 2022 : CSK च्या विजयानंतर धोनीनं सांगितली ‘मन की बात’, फॅन्सच्या व्यक्त केल्या भावना दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं चेन्नई सुपर किंग्सनं प्रत्येक विभागात सरस खेळ केल्याचं मान्य केलं. ‘त्यांनी सर्व विभागात आम्हाला मागे टाकले. आता आम्हाला पुढील तीन मॅचवर लक्ष केंद्रीत करणे आमच्या हातामध्ये आहे. या मॅच आम्ही जिंकल्या तर क्वालिफाय करू. टीममधील खेळाडूंना ताप आल्याची तसंच कोव्हिडची लागण झाल्याची घटना घडली आहे. बरंच काही सुरू आहे. पण, आम्ही हे निमित्त देणार नाही. जास्तीत जास्त सकारात्मक राहणे आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला चांगल्या मानसिक अवस्थेत राहण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.’ असं पंतनं सांगितलं.