JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर CSK अडचणीत, कॅप्टन जडेजानं सांगितला सर्वात मोठ्या दुखण्यावर उपाय

IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर CSK अडचणीत, कॅप्टन जडेजानं सांगितला सर्वात मोठ्या दुखण्यावर उपाय

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) धक्कादायक ठरत आहे. गतविजेत्या टीमचा पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) धक्कादायक ठरत आहे. गतविजेत्या टीमचा पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव झाला आहे. या सिझनमध्येच चेन्नईचा कॅप्टन बनलेल्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं (Punjab Kings) चेन्नईचा 54 रननं पराभव केला आहे. जडेजानं सांगितला उपाय मागील सिझनमध्ये सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप पटकावणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या सिझनमध्ये फेल ठरतोय.  पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज 4 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला. कागिसो रबाडाने ऋतुराजला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज शून्य रनवर आणि लखनऊ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 1 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला, म्हणजेच यंदाच्या 3 मॅचमध्ये ऋतुराजनं फक्त 2 रन केले आहेत. सीएसकेचा कॅप्टन जडेजानं या मॅचच्या पराभवाचं खापर खराब बॅटींगवर फोडलं. त्याचबरोबर त्यानं टीमची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजेच ऋतुराजच्या फॉर्मवर उपाय देखील सांगितला आहे.  ‘आम्ही ‘पॉवर प्ले’ मध्येच विकेट्स गमावल्या आणि आमची लय हरवली. त्यामुळे मॅचमध्ये पुनरागमन करणे खूप अवघड झाले. आम्ही आणखी भक्कमपणे स्पर्धेत परत येऊ. आम्हाला ऋतुराजचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. आम्हाला माहिती आहे की तो फॉर्ममध्ये येईल आणि जोरदार पुनरागमन करेल. शिवम दुबेनं चांगली बॅटींग करून प्रभावित केले आहे. आम्ही नक्कीच आमचे सर्वोत्तम देऊ,’ असे जडेजाने स्पष्ट केले. IPL 2022 : लिव्हिंगस्टोनने मारला आयपीएलमधला सगळ्यात मोठा सिक्स, धोनीही बघत बसला, VIDEO पंजाब किंग्जच्या 181 रनचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात अत्यंत खराब झाली. 36 रनवरच टीमचे 5 खेळाडू आऊट झाले होते, पण शिवम दुबेने (Shivam Dube) धोनीच्या (MS Dhoni) मदतीने पंजाबच्या बॉलिंगवर आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. शिवम दुबेने 30 बॉलमध्ये 57 रन केले, पण त्याची विकेट गेल्यानंतर सीएसकेची बॅटिंग पुन्हा गडगडली. सीएसकेची टीम तीन सलग पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये नवव्या नंबरवर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या