JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: CSK च्या खेळाडूला 'लेडी लक'चा फायदा, लग्नानंतर पहिल्याच मॅचमध्ये काढला वचपा

IPL 2022: CSK च्या खेळाडूला 'लेडी लक'चा फायदा, लग्नानंतर पहिल्याच मॅचमध्ये काढला वचपा

आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीमध्ये कॉनवेनं (Devon Conway) त्याच्या लग्नाचा बार उडवला. लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी त्यानं खास सुट्टीही घेतली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होतो. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) ओपनर डेव्हॉन कॉनवेचंही (Devon Conway) नुकतंच लग्न झालंय. आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीमध्ये कॉनवेनं त्याच्या लग्नाचा बार उडवला. लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी त्यानं खास सुट्टीही घेतली होती. कॉनवे लग्नानंतर आयपीएलमध्ये परतला आणि त्यानं पहिल्याच मॅचमध्ये कमाल केली. खराब कामगिरीमुळे टीममधून वगळण्यात आलेल्या कॉनवेला ‘लेडी लक’ चा फायदा झाला. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 आऊट 202 रन केले. या मोठ्या धावसंख्येत सीएसकेच्या ओपनिंग जोडीचा मोठा वाटा होता. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 182 रनची विक्रमी भागिदारी केली. गायकवाडनं 99 तर कॉनवेनं 55 बॉलमध्ये नाबाद 85 रन केले. कॉनवेचा आयपीएल कारकिर्दीमधील हा दुसराच सामना होता. तो यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता. 26 मार्च रोजी झालेल्या या मॅचमध्ये त्यानं फक्त 3 रन केले होते. IPL 2022 : धोनीचा सल्ला आला कामी, CSK ला मिळाला हिरो! एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच केकेआर विरूद्ध आलेल्या अपयशानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नव्हती. कॉनवेनं मागच्या महिन्यात त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनबरोबर लग्न केलं. या लग्नासाठी तो सीएसकेच्या बायो-बबलच्या बाहेर गेला होता. त्यानंतर पुन्हा टीममध्ये दाखल होण्यापूर्वी त्याला 3 दिवस क्वारंटईन राहावं लागलं. बायो-बबलच्या बाहेर जाण्यापूर्वी सीएसकेनं त्याच्यासाठी प्री वेडिंग पार्टी देखील आयोजित केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या