JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : CSK च्या 'फ्लॉप शो'वर कोच फ्लेमिंग नाराज, जाहीरपणे दिली चुकांची कबुली

IPL 2022 : CSK च्या 'फ्लॉप शो'वर कोच फ्लेमिंग नाराज, जाहीरपणे दिली चुकांची कबुली

आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) या सिझनमधील आव्हान संपल्यात जमा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) या सिझनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. सीएसकेनं आत्तापर्यंत 10 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. बुधवारी आरसीबी विरूद्ध झालेल्या लढतीमध्येही (RCB vs CSK) सीएसकेचा 13 रननं पराभव झाला. या पराभवानंतर टीमच्या एकूण कामगिरीवर हेड कोच स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) नाराजी व्यक्त केली आहे. टीमनं तीन्ही विभागात खराब कामगिरी केल्याचं फ्लेमिंगनं सुनावलं. फ्लेमिंगनं यावेळी टीमच्या खराब फिल्डिंगवर नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही सर्वच विभागात खराब खेळ केला. आमची फिल्डिंग चांगली झाली नाही. आम्ही कॅच सोडले ही काळजीची बाब आहे. अनेक मॅचमध्ये आम्ही विजयाच्या जवळ होतो. त्यानंतरही आमच्या हातातून सामने निसटले. आम्ही निर्णायक विजय मिळवू शकलो नाही. टीमचा फॉर्म खराब असेल तरच या गोष्टी घडतात. आम्ही तीन्ही विभागात आमच्या क्षमतेपेक्षा खराब खेळ केला.’ असं फ्लेमिंगनं मान्य केलं. चेन्नईला या स्पर्धेत दुखापतींचाही फटका बसला. दीपक चहर दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. एडम मिल्ने एक मॅचनंतर स्पर्धेतून आऊट झाला. मोईन अली देखील जखमी झाल्यानं काही सामने खेळू शकला नाही. फ्लेमिंग या विषयावर म्हणाला की, ‘आम्ही काही बॉलर गमावले, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यानंतरही आमची कामगिरी साधारण ठरली. आमच्या योजनेत काही खेळाडू होते जे आम्ही सुरूवातीलाच गमावले. त्यामुळे आम्ही तरूण खेळाडूंना संधी दिली. मुकेश चौधरीनं चांगला खेळ केला. सिमरजीतलाही संधी मिळाली. पण, आमचं संतुलन नीट नव्हतं. त्याचा आम्हाला फटका बसला.’ IPL 2022, SRH vs DC Dream 11 Team Prediction: ‘हे’ खेळाडू करतील तुम्हाला मालामाल बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 174 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 160 रनच करता आल्या. ठराविक अंतरानं विकेट्स गमावल्यानं आम्ही हा सामना गमावल्याचं म सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या