मुंबई, 24 एप्रिल : सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (SRH vs RCB) फक्त 8 ओव्हर्समध्ये पराभव केला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या आरसीबीनं सपशेल निराशा केली. त्यांची संपूर्ण टीम फक्त 68 रनवर ऑल आऊट झाली. हा या सिझनमधील कोणत्याही टीमचा सर्वात कमी स्कोअर आहे. आरसीबीच्या टीममधील सुयश प्रभूदेसाई आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाच दोन अंकी रन करता आले. आरसीबीनं या सिझनची सुरूवात दमदार केली होती. पण सनरायझर्स विरूद्धच्या मॅचनं ही टीम अडचणीत आली आहे. अवघ्या आठ ओव्हर्समध्ये पराभव स्विकारल्यानं ‘जुनी आरसीबी परत आली’ अशीच भावना फॅन्स सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. क्रिकेटच्या मैदानात लाज घालवणाऱ्या आरसीबीची फॅन्सनी सोशल मीडियावर जोरदार शाळा घेतली आहे.
आयपीएलच्या या मोसमातला हैदराबादचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे, पहिल्या 2 मॅच गमावल्यानंतर हैदराबादने या हंगामात अजून एकही मॅच गमावलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. Sachin Tendulkar Birthday : 24 वर्षांपूर्वी सचिननं साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्नची उडाली होती झोप पुन्हा 23 एप्रिल 23 एप्रिल या तारखेचं आरसीबीशी खास नातं आहे. 23 एप्रिल 2017 साली आयपीएल इतिहासातल्या निच्चांकी स्कोअरची नोंद झाली. केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीची टीम फक्त 49 रनवर ऑल आऊट झाली होती. आता 23 एप्रिल 2022 सालीही आरसीबीची निराशाजनक कामगिरी झाली आहे. 68 रनवर ऑल आऊट हा आयपीएल इतिहासातला सहावा सगळ्यात कमी स्कोअर आहे. .23 एप्रिल 2013 साली आरसीबीने आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी धावसंख्या केली होती. पुणे वॉरियर्सविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 263 रन केले होते.