मुंबई, 7 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियानं तरूण खेळाडूंना संधी दिली आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या या मॅचची तयारी भारतीय टीमनं सोमवारी सुरू केली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमनं सोमवारी सराव केला. पहिल्या दिवसाच्या सरावात तरूण खेळाडूंनी जास्त सराव केला. आयपीएल स्पर्धेत 150 किमी प्रती तास वेगानं सातत्यानं बॉलिंग करणाऱ्या जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकचा (Umran Malik) या मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. उमराननं सोमवारी संध्याकाळी नेटमध्ये बराच काळ बॉलिंग केली. त्याच्या बॉलिंगवर ऋषभ पंतनं (Rishbah Pant) चांगली फटकेबाजी केली. उमरानपेक्षा अर्शदीप सिंग या पंजाबच्या बॉलरनं त्याच्या यॉर्करनं टीम मॅनेजमेंटला अधिक प्रभावित केलं. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान या सिनिअर फास्ट बॉलर्सच्या उपस्थितीमध्ये उमरान आणि अर्शदीपला पहिल्या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अर्शदीपनं बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्या देखरेखीमध्ये सराव केला.
भुवनेश्वर कुमारचा समावेश निश्चित या मालिकेत भारतीय फास्ट बॉलिंगचं नेतृत्त्व भुवनेश्वर कुमार करणार आहे. त्यानं पहिल्या दिवशी साधारण 15 मिनिटं बॉलिंग केली. हर्षल पटेल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांनी या सत्रामध्ये आराम केला. टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकनं थ्रो डाऊन स्पेशालिस्ट सोबत लॅप स्कूप आणि रिव्हर्स स्कूप यांचा सराव केला. ऋषभ पंतचं खेळणं निश्चित असल्यानं कार्तिक प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. काय सांगता! जो रूट मोडणार सचिनचा रेकॉर्ड, माजी कॅप्टनचा दावा भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याच्या दरम्यान मैदानात ड्यू असेल असं डीडीसीएच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. पण, पहिल्या दिवशी टीम इंडियानं ओल्या बॉलनं सराव केला नाही.