JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी: टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी 'या' खेळाडूची निवड, रोहितची घेणार जागा

मोठी बातमी: टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी 'या' खेळाडूची निवड, रोहितची घेणार जागा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल? याचं उत्तर अखेर मिळालं आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल? याचं उत्तर अखेर मिळालं आहे. निवड समितीनं यापूर्वी खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) हटवून  रोहित शर्माची (Rohit Sharma) या पदासाठी  निवड केली होती. पण मुंबईत बॅटींगचा सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि तो दौऱ्यातून बाहेर पडला. त्यानंतर या जागेसाठी अनेक नावांची चर्चा होती. ‘एएनआय’ नं दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुलची (KL Rahul) रोहितच्या अनुपस्थितीमधे टेस्ट टीमचा उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. राहुलला यापूर्वी टी20 टीमचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राहुल फक्त याच सीरिजसाठी टेस्ट टीमचा उपकर्णधार असेल. रोहित शर्मा टीममध्ये परतल्यानंतर तो ही जबाबदारी सांभाळेल. केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच अनेक दावेदारांवर मात करत त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल आणि मयांक अग्रवाल दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ओपनिंग करणार असल्याचं टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) यापूर्वीच स्पष्ट केले आहे. विराट कोहली शतक कधी करणार? दिग्गज खेळाडूनं केली भविष्यवाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या