मुंबई, 12 जून : दक्षिण आफ्रिकेचा बॅटर डेव्हिड मिलर (David Miller) याचं आयुष्य गेल्या काही महिन्यांत पूर्ण बदललं आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मिलरला कोणत्याही टीमनं खरेदी केले नव्हते. गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) दुसऱ्या दिवशी त्याला खरेदी केले. त्यानंतर मिलरनं मागं वळून पाहिलेलं नाही. मिलरनं आयपीएल 2022 मध्ये 142.72 च्या स्ट्राईक रेटनं 481 रन करत गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीचा गुजरातच्या विजेतेपदामध्ये मोठा वाटा होता. आयपीएलनंतरही मिलरचा फॉर्म कायम आहे. त्यानं दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी यशस्वी फिनिशरची भूमिका पार पाडत टीमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मिलरला कसं रोखायचं? हा प्रश्न सध्या टीम इंडियासमोर आहे. कटकमध्ये रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी20 पूर्वी मिलरला रोखण्यासाठी काय प्लॅन केला आहे? असा प्रश्न टीम इंडियातील सिनिअर बॉलर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) विचारण्यात आला होता. त्यावर ‘मिलरला दक्षिण आफ्रिकेनं टीममधून वगळावं,’ अशी मजेशीर मागणी भुवनेश्वरनं केली. ‘मिलर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याला बॉलिंग करणे हे अवघड आहे. दक्षिण आफ्रिकेनं त्याला टीममधून वगळावं अशी माझी इच्छा आहे, पण ते तसं करणार नाहीत. त्यानं आयपीएलमध्ये अतिशय चांगली बॅटींग केली. आम्हाला त्याची क्षमता माहिती आहे. त्याला बॉलिंग करणे हे आव्हानात्मक आहे,’ असं भुवनेश्वरनं दुसऱ्या मॅचच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. IPL Media Rights : 90 कोटींवर राज्य करण्यासाठी दिग्गज कंपन्या मैदानात, नवे रेकॉर्ड निश्चित कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी20 मध्ये हर्षल पटेलच्या जागेवर उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंग यांना संधी देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करू शकते. त्याचबरोबर स्पिन बॉलिंगमध्येही एक बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यात अक्षर पटेलनं खराब बॉलिंग केली होती. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 40 रन दिले. अक्षरच्या जागी रवी बिश्नोईला खेळवण्याचा पर्याय टीम मॅनेजमेंटकडे आहे.