JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 138 कोटी भारतीयांच्या साक्षीनं धोनीबद्दल सांगतो की... गौतम गंभीरनं केला मोठा खुलासा 

138 कोटी भारतीयांच्या साक्षीनं धोनीबद्दल सांगतो की... गौतम गंभीरनं केला मोठा खुलासा 

धोनीच्या कॅप्टनसीची थोरवी संपूर्ण जगानं मान्य केली आहे. त्यानंतरही टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) सोबत असलेल्या धोनीच्या नात्याची क्रिकेट विश्वात नेहमीच चर्चा होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च : महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) भारतामधीलच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वातील महान कॅप्टनमध्ये समावेश होतो. टीम इंडियाला तीन आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या निश्चयानं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसके उतरणार आहे. धोनीच्या कॅप्टनसीची थोरवी संपूर्ण जगानं मान्य केली आहे. त्यानंतरही टीम इंडियाचा व्हाईस माजी कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) सोबत असलेल्या धोनीच्या नात्याची क्रिकेट विश्वात नेहमीच चर्चा होते. धोनीच्या अनेक निर्णयावर गंभीरनं वेळोवेळी टीका केली आहे. क्रिकेट विश्वात नेहमीच परखड मतांसाठी प्रसिद्ध असलेल्या गंभीरनं पहिल्यांदाच धोनीशी असलेल्या त्याच्या नात्यावर खुलासा केला आहे. 138 कोटी भारतीयांची साक्ष जतीन सप्रूच्या ‘ओव्हर अँड आऊट’ या कार्यक्रमात गंभीरला धोनीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘गौतम गंभीरला धोनी आवडत नाही’ या प्रकारच्या बातम्या का येतात? असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गंभीरनं सांगितलं की, ‘या निराधार बातम्या आहेत. मला धोनीबद्दल नेहमीच आदर आहे. मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून 138 कोटी भारतीयांच्या साक्षीनं सांगतो की धोनीला देवाच्या कृपेनं कधीच अडचण येऊ नये. पण कधी कुणाची गरज पडली तर त्याच्या बाजूनं उभा राहणारा मी पहिला व्यक्ती असेन. धोनीनं भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. तो कॅप्टन होता तेव्हा मी दीर्घकाळ टीमचा व्हाईस कॅप्टन होतो. आमची कदाचित क्रिकेटकडे पाहण्याची पद्धत वेगळी असेल. पण तो नेहमीच टीमसाठी खेळला. तो एक जबरदस्त खेळाडू आणि अतिशय चांगला माणूस आहे.’ असे गंभीरने यावेळी स्पष्ट केले. IPL 2022 : टीम इंडियाच्या खेळाडूंचा ‘हबीबो’ गाण्यावर दमदार डान्स Video Viral धोनीच्या कॅप्टनसीमध्ये गंभीरनं नेहमीच चांगलं योगदान दिलं आहे. 2007 साली पाकिस्तान विरूद्ध झालेल्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. तसंच 2011 साली श्रीलंकेविरूद्ध झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्येही गंभीरनचं भारताकडून सर्वाधिक 97 रनची खेळी केली होती. टीम इंडियानं जिंकलेल्या या दोन्ही विजेतेपदामध्ये गंभीरच्या खेळीचा मोठा वाटा होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या