JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स, लाथाबुक्यांनी केली मारहाण! VIDEO

IND vs SA : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स, लाथाबुक्यांनी केली मारहाण! VIDEO

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) मॅच पाहण्यासाठी अरूण जेटली स्टेडिअममध्ये (Arun Jaitley Stadium) उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांमध्ये वेगळाच सामना रंगला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला टी20 सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर गुरूवारी झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा 7 विकेट्सनं पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या बॅटर्सनी दमदार खेळ केला. त्याचवेळी मॅच पाहण्यासाठी अरूण जेटली स्टेडिअममध्ये (Arun Jaitley Stadium) उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांमध्ये वेगळाच सामना रंगला होता. या स्टेडिअमच्या ईस्ट स्टँडमध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांमध्ये जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्यांचा प्रसाद दिला. हे प्रकरण चांगलंच चिघळलेलं पाहून अखेर पोलिसांना मध्यस्थी करत दोन्ही गटाला शांत करावं लागलं. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडीओच्या सुरूवातील दोन मुलं एका प्रेक्षकाला मारगाण करत असल्याचं दिसत आहेत. त्यानंतर आणखी दोन जण येऊन त्याच प्रेक्षकाला लाथाबुक्यांनी मारहाण करू लागतात. या मारहाणीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. या प्रकरणात माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या स्टँडमधील एक प्रेक्षक जास्तच उत्साही होता. तो बहुधा पहिल्यांदाच मॅच पाहण्यासाठी आला होता. त्याने मोठा झेंडा सोबत आणला होता. त्यामुळे त्याचा अन्य प्रेक्षकांशी वाद झाला. त्यानंतर झेंडा घेऊन आलेल्या प्रेक्षकांनी मागील स्टँडमधून आणखी काही जणांना बोलावलं आणि मारामारी सुरू झाली. ENG vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूमुळे प्रेक्षकाचं नुकसान, टीमनं अशी केली भरपाई, पाहा VIDEO भारताने दिलेलं 212 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 19.1 ओव्हरमध्येच पार केलं. डेव्हिड मिलरने (David Miller) 31 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यात 4 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. रस्सी व्हॅन डर डुसेनने (Rassie van der Dussen) 46 बॉलमध्ये नाबाद 75 रनची खेळी केली. रस्सीने 7 फोर आणि 5 सिक्स मारले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या