मुंबई, 3 जून : ऑस्ट्रेलिया विरूद्ध अॅशेस सीरिजमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कोच आणि कॅप्टन हे दोन्ही बदलण्यात आले आहेत. या बदलानंतर इंग्लिश टीम पहिल्यांदाच गुरूवारी न्यूझीलंड विरूद्ध टेस्ट मॅच खेळण्यासाठी उतरली. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लिश बॉलर्सनी दमदार सुरूवात केली. पण, त्यांच्या मेहनतीवर बॅटर्सनी पुन्हा एकदा पाणी फिरवलं. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लिश बॉलर्सनी भेदक मारा करत न्यूझीलंडची पहिली इनिंग 132 रनवरच संपुष्टत आणली. या छोट्या स्कोरला उत्तर देताना इंग्लंडनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 116 रन केले असले तरी त्यांनी 7 विकेट्स गमावल्या आहेत. इंग्लंडकडून अॅलेक्स लीस (25) आणि जॅक क्रॉली (43) यांनी चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 59 रनची भागिदारी केली. क्रॉली आऊट झाल्यानंतर ही जोडी फुटली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऑली पोपला (7) मोठी खेळी करता आला नाही. पोप आऊट झाल्यानंतर इंग्लिशच्या मिडल ऑर्डरला खिंडार पडले. जो रूट 11 तर नवा कॅप्टन बेन स्टोक्स फक्त 1 रनवर आऊट झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो आणि मॅथ्यू पोट्स आऊट झाल्यानं इंग्लंडची पहिल्या इनिंगमध्ये 7 आऊट 100 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडनं दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवत आणखी पडझड होऊ दिली नाही. IND vs SA T20 : आयपीएलनंतर आता वर्ल्ड कपची तयारी, आफ्रिकेविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांचा फक्त 132 रनवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसन आणि मॅटी पॉट्स यांना प्रत्येकी 4-4 विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन डि ग्रॅण्डहोमने सर्वाधिक 42 रन केले.