मुंबई, 5 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील लॉर्ड्स टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचं पारडं जड आहे. त्याचवेळी न्यूझीलंडलाही जिंकण्याची संधी आहे. या मॅचमध्ये अनेक संस्मरणीय प्रसंग घडले. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स (Ben Stokes) याचा शनिवारी वाढदिवस होता. त्याला वाढदिवशी अंपायरकडून गिफ्ट मिळालं. स्टोक्सला गिफ्ट बेन स्टोक्स कॉलीन डी ग्रँडहोमच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. आऊट झाल्यानंतर स्टोक्स परत जात होता. त्यावेळी तो नो बॉल असल्याचं लक्षात आल्यानं अंपायरनं त्याला परत बोलावलं. इंग्लंडच्या इनिंगमधील 27 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. 277 रनचा पाठलाग करताना त्यावेळी इंग्लंडची अवस्था 4 आऊट 76 अशी होती. स्टोक्सनं सुरूवातीलाच मिळालेल्या या गिफ्टचा फायदा घेतला. त्यानं यावेळी अर्धशतक झळकावलं.
लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सकाळी न्यूझीलंडची दुसरी इनिंग 285 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडसाठी विजयाचं 277 रनचं लक्ष्य आहे. या लक्ष्यचा पाठलाग करताना यजमानांची अवस्था 4 आऊट 69 झालीा होती. त्यानंतर जो रूट आणि बेन स्टोक्स या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 90 रनची भागिदारी करत इंग्लंडची इनिंग सावरली. 6,6,6,6,6,6… Pandey नं लगावले एका ओव्हरमध्ये 6 SIX, मॅचमध्ये केला 12 सिक्सर्सचा वर्षाव, VIDEO स्टोक्सनं कॅप्टन म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं. तो 54 रन काढून आऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर 5 आऊट 216 असा होता. जो रूट 77 तर बेन फोक्स 9 रन काढून नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 61 रनची आवश्यकता असून न्यूझीलंडला 5 विकेट्सची गरज आहे.