JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर

VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : कोरोनामुळं जगभरातील सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. यामुळे क्रिकेटच्या सर्व स्पर्धा आणि सामने रद्द झाले आहे. भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रिमिअर लीगही पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र असे असले तरी, सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यास सज्ज आहेत. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली यानं आपला सहकारी एबी डिव्हिलियर्सची संवाद साधताना बंगळुरू संघाची साथ सोडणार का? या प्रश्नाचे उत्तर दिले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. असे असले तरी, कोहलीने मी जोपर्यंत क्रिकेट खेळत आहे तोपर्यंत तरी RCBची साथ सोडणार नाही, असे उत्तर दिले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोहली आणि एबी एकमेकांशी संवाद साधत होते. यावेळी कोहलीनं “आयपीएल जिंकणे हे लक्ष्य आहे, पण काहीही झाले तरी संघाची साथ सोडणार नाही”, असे सांगितले. वाचा- कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत कोहलीने आरसीबी चाहत्यांचे कौतुक केले भारतीय कर्णधार म्हणाला, ‘हा एक चांगला प्रवास आहे. संघात एकत्र राहून आयपीएल जिंकण्याचे आमचे स्वप्न आहे. मला संघ सोडण्याचा विचार करावा लागेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. तो म्हणाला, ‘सत्र चांगले चालले नाही तर तुम्ही भावनिक होऊ शकता, परंतु जोपर्यंत मी आयपीएल खेळत आहे तोपर्यंत मी संघ सोडणार नाही. पण चाहत्यांचे संघावर असलेले प्रेम आश्चर्यकारक आहे. 2016च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने बंगळुरू संघाला हरवत आयपीएलचे विजेतेपद मिळवले. वाचा- …तर वर्षभर एकही क्रिकेट सामना होणार नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

वाचा- कोरोनामध्येही ‘हा’ देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव डिव्हिलियर्सलाही आवडतो आपला संघ डिव्हिलियर्सने आरसीबीबद्दल कोहलीच्या भावनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना गेल्या नऊ वर्षांपासून चाहत्यांच्या प्रेमाचा उल्लेखही केला. आयपीएलच्या सुरूवातीपासूनच कोहली आरसीबीकडून खेळत आहे. डीव्हिलियर्स म्हणाले, “ही माझी स्थिती आहे. मला कधीही आरसीबी सोडायचे नाही पण त्यासाठी मला सतत धावा करणे कायम ठेवावे लागेल”. एबी डिव्हिलियर्सनेही विराट कोहलीशी सहमती दर्शविली आणि असे सांगितले की त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असे चाहते कधीही पाहिले नाहीत. वाचा- लॉकडाऊनचा IPLलाही फटका, अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली स्पर्धा विराट आणि एबीचा एकदिवसीय संघ या दोघांनीही यानिमित्ताने भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त एकदिवसीय संघाची निवड केली. या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), युवराज सिंग, युजवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा हे आहेत. संकलन, संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या